नांदेड(प्रतिनिधी)-कलामहर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व बालकवी सुभाष त्र्यंबक वसेकर यांचे दि. 1 ऑक्टोबर 2022रोजी मध्यरात्री निधन झाले.
सुभाष वसेकर हे कलामहर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून या पदावरून कलेची सेवा 36 वर्ष पुर्ण करून सन 2007 साली सेवानिवृत्त झाले होते. अत्यंत कडक शिस्तीचे गुरूजी अशी त्यांची ख्याती होती.
श्री.सुभाष वसेकर हे बालकवी म्हणून ही प्रसिद्ध होते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी आपला देहदान केला असल्यामुळे कोणतेही अंतिम संस्कार त्यांच्यावर होणार नाहीत. कलामहर्षी त्र्यंबक वसेकर चित्राकला महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य, प्राध्यापक, आणि विद्यार्थी यांच्याकडून सरांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी विणा वसेकर, मुलगा पराग वसेकर, सुन वर्षा वसेकर, मुलगी पल्लवी वसेकर, बहिणी असा परिवार आहे. कलाक्षेत्रातील एका दिग्गजाच्या निधनाने कलाक्षेत्रावर संकट आले आहे.
