

बिलोली,(प्रतिनिधी)- सुने सोबत वाद विवाद झाल्याने सुपुत्राने आपल्याच जन्मदात्याचा जीव घेतल्याचा प्रकार कासराळी ता. बिलोली येथे घडला आहे.पोलिसांनी एक तासातच मारेकरी पुत्राला गजाआड केले आहे.
घरामध्ये मुलगा वडिल जेवण केल्या नंतर त्यांच्या समोरील जेवणाचे ताट का उचलत नाहीस ? असे अधिकार वाणीने मयत सासरा लालु पिराजी इंगळेने सुनेला विचारणा केली. वाद वाढत गेल्या नंतर मुलगा प्रकाश लालु इंगळे वय ३० वर्ष यास राग आला हा राग विकोपाला जाऊन जन्मदात्या मुलानेच वडिल लालू पिराजी इंगळे वय ६० वर्ष यांच्यावर रहात्या घरातच कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला आहे.ही घटना दि.२९ रोजी रात्री नऊ ते दहा वाजताच्या सुमारास तालुक्यातील कासराळी येथे घडली आहे.
आरोपी प्रकाश इंगळे हा वडिलाचा खून केल्या नंतर पळून जात असतांना पोलीस निरिक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाठलाग करून कासराळी बेळकोणी रोडवर ताब्यात घेतले असून या बाबत पोलीस स्टेशनमध्ये मयताची पत्नी पार्वतीबाई लालु इंगळे वय ५५ वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार विविध कलमांवये गुन्हा दाखल केला आहे.आरोपी प्रकाश इंगळे हा कांही दिवस तेलंगणा राज्यातील नंदिपेठ येथे शेती कामासाठी गेला होता.परत दोन ते तीन महिन्या पूर्वी आपल्या कासराळी या गावी येऊन परिवारासह राहत होता.घरामध्ये या ना त्या कारणाने नेहमी भांडणे व्हायची अशात दि.२९ रोजी आरोपी प्रकाश घरी आला आई वडिला सोबत मांसाहारी जेवणही झाले. जेवणा नंतर वाद सुरू झाला यातच या नराधामाने हे कृत्य केले.विशेष म्हणजे ज्या वेळी हा वाद पेटला त्या वेळी कांही जणांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही चाकुचा वार करण्याची भीती दाखवल्याचे समजले.मयताच्या पश्च्यात पत्नी,तीन मुली,सुन,नातवंड असा परिवार आहे.यावेळी माजी आमदार सुभाष साबणे,जि.प.चे माजी सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी या कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला.