

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी च्या वतिने नांदेड दक्षीण व उत्तर विधानसभा कार्यालय संविधान सदन बै.खोब्रागडेनगर -०२नवामोंढा नांदेड येथे शहीद भगतसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम हे होते.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते आम आदमी पार्टी चे जेष्ठ नेते नरेन्द्र सिंघ ग्रंथी म्हणाले की,आम आदमी पार्टी ही शहीद भगतसिंह व संविधान निर्माते डॅा.यांच्या विचारांचीधुरा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी चे कार्यकरते याचा आम्हास सार्थ अभिमान वाटत आहे.आज भगतसिंह यांचे क्रांतीकारी विचार हे युवकांना प्रेरणादायी आहेत,असेही ग्रंथी म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद भगतसिंह यांच्या प्रतीमेस नरेन्द्र सिंघ ग्रंथी,जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम, सहसंयोजक ऍड.. रितेश पाडमुख डॉ.अवधुत पवार नांदेड विधानसभा प्रमुख ऍड. जगजीवन भेदे,जिल्हायुवाध्यक्ष अजीत पाटील,जयेश चंदेल, ऍड..अनुप आगाशे ,शिलवंत शिवभगत, ऍड.विशाल गच्चे, प्रविण खिल्लारे, शेख अदील यांनी पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले. या वेळी वरिल सर्व मान्यवरांनी शहीद भगतसिंह यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकनारे विचार मांडले. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार ऍड. जगजीवन भेदे यांनी मानले