नांदेड(प्रतिनिधी)-चोरीचे साहित्य घेणाऱ्या एका 46 वर्षीय व्यक्तीला मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी दोन महिने साधा कारावास आणि 500 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
नांदेड शहरातील डॉक्टर्सलेन परिसरातून सन 2016 मध्ये एक एलईडी दवाखान्यातून चोरी झाला होता. या संबंधाने एका चोरला अटक करण्यात आली तेंव्हा त्याने चोरलेला एलईडी शेख नासेर अब्दुल रजाक यांना विक्री केल्याचे सांगितले. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 411 नुसार गुन्हा क्रमांक 196/2016 दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शेख नासेर अब्दुल रजाक (46) रा.पक्कीचाळ या भंगार दुकानदाराविरुध्द चोरीचा ऐवज घेतला म्हणून पोलीस अंमलदारा शंकर ढगे यांनी त्याच्याविरुध्द दोषारोपपत्र सादर केले होते. दोषारोपपत्रात उपलब्ध पुरावे आणि न्यायालयासमक्ष आलेल्या पुराव्यांच्या आधारावर न्यायाधीश जैन देसरडा यांनी शेख नासेर अब्दुल रजाकला दोन महिने साधा कारावास आणि 500 रुपये रोख दंड ठोठावला आहे.
