नांदेड(प्रतिनिधी)-“सही पोषण देश रोशन’ या घोषवाक्यासह जागतिक कन्यादिनी नोबल उर्दु हायस्कुल येथे बालिकांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय बोराटे यांच्या अध्यक्षतेत झाला.
25 सप्टेंबर हा जागतिक कन्या दिन या दिवशी लेबर कॉलनी येथील नोबल हायस्कुल येथे पोषण महाअंतर्गत पोषण प्रतिज्ञा घेण्यात आली. शाळेचा परिसर “सही पोषण देश रोशन’ या घोषवाक्याने दुमदुमला. विद्यार्थ्यांसाठी पोष्टीक आहार, विषाणूमुक्त भारत, बालिकांच्या मासिक समस्या, वैयक्तिक स्वच्छता, बालविवाहचे दुष्परीणाम या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले हा कार्यक्रम बालविकास प्रकल्प अधिकारी विजय बोराटे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.
नोबल उर्दु हायस्कुलचे मुख्याध्यापक अब्दुल वद्दू, अब्दुल सलीम, मोहम्मद जुमेद, सज्जाद सर, मोहम्मद इमरान आणि शाळेच्या इतर शिक्षकांनी या कार्यक्रमास सहकार्य केले. बाल विकास प्रकल्पातील कर्मचारी त्रिशला सावंत, माया राहेगावकर, गोदावरी गुंडारे, अरुणा शिसोदे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
