नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना आज त्यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यात आले.
25 सप्टेंबर हा पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचा जयंती दिन. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक एल.व्ही. राख यांनी आणि इतर सहकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना पुष्पअर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उपनिरिक्षक उत्तम वाघमारे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, विनोद भंडारे यांनी उत्तम प्रकारे केले.
