आरोग्य ताज्या बातम्या

राष्ट्रीय पोषण माह निमित्त स्त्री रुग्णालय नांदेड येथील पोषण आहाराबाबत जागृती 

नांदेड (प्रतिनिधी)- महिलांमधील आरोग्याचे असंख्य प्रश्न हे त्यांच्या पोषण आहाराशी निगडीत असतात. सुदृढ महिला जशी सुदृढ बाळाला जन्म देऊ शकते त्याच धर्तीवर सुदृढ पोषण आहार हा चांगल्या आरोग्याला तेवढाच आवश्यक असतो. महिलांनी आपल्या भोवताली सहज उपलब्ध असणाऱ्या पालेभाज्या, डाळी, मोड आलेली धान्य, त्या-त्या काळात निसर्गात उपलब्ध असलेली फळे याचा आहारात समावेश करणे तेवढेच आवश्यक असते, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले.

स्त्री रुग्णालय, श्याम नगर, नांदेड येथे राष्ट्रीय पोषण महा २०२२ निमित्त रुग्णालयात महिलांमध्ये पोषण विषयक आहाराच्या जागृती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर, डॉ. एन. बोराटे, डॉ. राजेश बुट्टे, डॉ. ललिता सुस्कर, डॉ. सुनील पल्लेवाड, डॉ. मोहिनी भोसीकर, डॉ. राम मुसांडे, डॉ. देशमुख, डॉ. गुरुतवाड, डॉ. आयनीले, डॉ. लवटे, डॉ. हत्ते, डॉ. आवटी, डॉ. शिवकाशी धर्मले, आहार तज्ञ उर्मिला जाधव, गजानन माने तसेच स्त्री रुग्णालय नांदेड येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

पोषण माह निमित्त स्त्री रुग्णालयातर्फे विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले. यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींच्या आरोग्यासाठी पोषण विषयक माहिती देणारी प्रदर्शनी लावण्यात आली. नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पोषणावर आधारित नाटिका सादर करून पोषणाचे जीवनातील महत्त्व पटवून दिले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी रांगोळी स्पर्धा व पोषणमूल्यांनी भरपूर पदार्थ बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली.

 

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *