ताज्या बातम्या नांदेड

नांदेड शहरातील मतदारांना आधार लिंकसाठी आठ केंद्र ; रविवार 25 सप्टेंबर रोजी विशेष सुविधा

नांदेड (प्रतिनिधी)– ८६ उत्तर व ८७ दक्षिण मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदार नांदेड महानगरात वास्तव्यास आहेत. महसूल प्रशासन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणी बाबत शहरातील मतदारांसाठी रविवार दि.२५ सप्टेंबर रोजी शहरात मनपाच्या सहा क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत एकूण आठ ठिकाणी मतदार ओळखपत्रास आधार लिंक करण्यासाठी मतदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त शहरी भागातील मतदारांनी आधार लिंक करून घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी नांदेड विकास माने यांनी केले आहे.

 

या आठही ठिकाणी महानगरपालिकाचे वसूली लिपिक सर्व मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अर्थात बिएलओ, या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत बसणार आहेत.

 

शहरातील तरोडा खुर्द भागासाठी शिवपार्वती मंगल कार्यालय समोर तर तरोडा बुद्रुक व सांगवी या भागाकरिता साई मंदिर समोर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे अशोक नगर झोन अंतर्गत सर्व मतदार यादीभागासाठी अशोक नगर क्षेत्रिय अधिकारी कार्यालय क्र २ पाण्याच्या टाकीजवळ कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे तसेच गणेशनगर झोन अंतर्गत विजय मंगल कार्यालय विजयनगर हनुमान मंदिराजवळ या कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे तसेच वजीराबाद चा भागामध्ये मनपाचे क्षेत्रिय अधिकारी कार्यालयाजवळ या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर देगलूर नागा परिसरात हैदराबाद दवाखाना जवळ तसेच इतवारा भागातील जनतेसाठी चौफाळा पोलीस चौकी जलळ कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको हडको झोन मधील मतदाराकरिता कामगार कल्याण केंद्र परिसरात कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मतदारांनी या ठिकाणी जाताना आपले निवडणूक ओळखपत्र व आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. शिवाय मतदार स्वतः घरी बसल्या ठिकाणी आपल्या ॲड्राईड फोन मध्ये वोटर हेल्पलाईन अॅप डाउनलोड करून सुद्धा फार्म नं सहा ब भरून आपली आधार जोडणी करू शकतात अशी माहिती तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिली. सर्व सुशिक्षित मतदारांनी सदर ॲप द्वारे आपली आधार जोडणी करून आपले मतदार यादीतील नाव सुनिश्चित करावे व दुबार नावे वगळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी करून मतदार यादी प्रमाणिकीकरणासाठी आधार लिंक करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

सदर कॅम्प चे नियोजनात क्षेत्रिय अधिकारी संजय जाधव ,मिर्झा बेग,रावण सोनसळे,राजेश चव्हाण,रमेश चवरे ,रईसोद्दीन ,मंडळ अधिकारी अनिरूद्ध जोंधळे,आर.डी शिंदे,म्हेत्रे,नांदेडकर आदीं सह तलाठी गाढे,भांगे,सय्यद मोहसिन ,आदीं सहभागी आहेत अशी माहिती किरण अंबेकर तहसीलदार नांदेड यांनी दिली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *