नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) च्या सुचनेनुसार एटीएस पथकाने देगलूर नाका परिसरातून एका युवकाला ताब्यात घेतले असून त्याची अत्यंत गुप्तपणे चौकशी सुरू आहे. एनआयएने राज्यभरात अनेक ठिकाणी छापे टाकून खंडीभरपेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतले आहे.
काल रात्री अतिरेकी कार्यवाह्यांसाठी पुरवल्या जाणाऱ्या पैशांचा तपास करतांना एनआयएने देशभर अनेक जागी छापे मारले, अनेकांना ताब्यात घेतले, कांहींना नोटीस देवून सोडले असे प्रकार मागच्या दोन-तीन महिन्यापासून सुरू आहेत. नांदेडमध्येच असा एक प्रकार घडला होता. त्यात तीन जणांची चौकशी नांदेडच्या एटीएस कार्यालयात झाली. त्यानंतर त्यांना नोटीस देवून सोडण्यात आले.
काल रात्री देगलूर नाका परिसरातून पीएफआय या संघटनेचा सदस्य मेराज अन्सारी याला नांदेडच्या एटीएस पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याचा किराणा दुकान चालविण्याचा व्यवसाय आहे. सध्या वृत्तलिहिपर्यंत त्याची चौकशी नांदेडच्या एटीएस कार्यालयात सुरू आहे.