ताज्या बातम्या विशेष

एटीएसने पकडलेल्या पाच जणांना आठ दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या एटीएस पथकाने नांदेडमधून एकच व्यक्ती ताब्यात घेतला होता. इतर चार परभणी येथून आणले होते. नांदेडमधील एक अद्याप एटीएस पथकाला भेटला नाही. न्यायालयात हजर केलेल्या पाच जणांना मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी पाच जणांना 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेडच्या एटीएस पथकाने एनआयएच्या मार्गदर्शनावर काल रात्री नांदेडमधून एक युवक ताब्यात घेतला होता. परंतू आज दुपारी एटीएस पथकाने पाच जणांना न्यायालयात हजर केले तेंव्हा इतर चार जण परभणी येथील आहेत हे समजले. न्यायालयात हजर केले पाच जण पुढीलप्रमाणे मोहम्मद मेहराजोद्दीन अब्दुल हई अन्सारी (42) रा.हैदरबाग नांदेड, अब्दुल सलाम अब्दुल कयुम (34) रा.परभणी, मोहम्मद निसार मोहम्मद अब्दुल रशीद (41) रा.परभणी, मोहम्मद जावेद मोहम्मद शब्बीर अन्सारी (35) रा.परभणी, मोहम्मद अब्दुल करीम अब्दुल हलीम (37) रा.परभणी. एटीएस पथकाने नांदेडमधून हवा असलेला एक मोहम्म आबेद अली महेबुब अली हा सापडला नाही.
न्यायालयात एटीएस पथकाचे पोलीस उपअधिक्षक पानेकर, पोलीस निरिक्षक सुनिल नाईक, इतर अनेक अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदारांनी या पाच जणांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात पानेकर आणि सरकारी वकीलांनी सादरीकरण केले की, हे सर्व पाच जण पीएफआय(पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया) चे सदस्य आहेत. 29 ऑक्टोबर 2021, 15 एप्रिल 2022, 27 ऑगस्ट 2022 आणि 29 ऑगस्ट 2022 या रोजी नांदेड आणि परभणीमध्ये झालेल्या धरणे आंदोलना दरम्यान या पीएफआयच्या सदस्यांनी केंद्र सरकार वि रुध्द प्रक्षोभक भाषणे केली. त्यात तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा विरोध होता. इतर धर्मियांचा उल्लेख होता आणि त्यातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या शब्दांचा वापर होता. या सर्व कारणांमुळे एटीएस पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी चंदेल यांच्या तक्रारीवरुन काळा चौकी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे आणि त्या गुन्ह्यात या पाच आरोपींना पकडले आहे. या सर्वांना हे काम करण्यासाठी अर्थपुरवठा कोठून होतो, मिळून आला नाही तो मोहम्मद आबेद अली शोधायचा आहे. त्यांना अशी शिकवण कोण देतो हे शोधायचे आहे यासाठीच दहा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असे सादरीकरण केले.
या प्रकरणात आरोपींच्यावतीने ऍड. सय्यद अरीबोद्दीन यांनी बाजू मांडतांना पीएफआय या संघटनेचे हे पाच सदस्य आहे याचा काही लेखी पुरावा उपलब्ध नाही. तसेच या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या कलमांचा सविस्तर उल्लेख करून त्यातील तांत्रिक बाजू न्यायालयासमक्ष सादर केल्या. पीएफआय या संघटनेवर शासनाने बंदी लादलेली नाही त्यामुळे त्या संघटनेचा सदस्य असणे हा गुन्हा होवू शकत नाही. या प्रकरणाचा गुन्हा मुंबईला दाखल झाला, चार जणांना परभणी येथून पकडले, एकाला नांदेड येथून पकडले तेंव्हा न्यायालयाला हे सर्व ज्युरीडीक्शन आहे काय? असा मुद्दा उपस्थित केला. न्यायालयाला जास्तीत जास्त हा गुन्हा काळा चौकी मुंबई येथे दाखल झालेला आहे अशा परिस्थिती या आरोपींना प्रवासाचा ताबा देण्याचा अधिकार आहे असे सांगितले.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश किर्ती जैन देसरडा यांनी या पाच जणांना 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. न्यायालयाचा आदेश झाल्यानंतर न्यायालय परिसराच्या बाहेर काही जणांनी या प्रकरणाच्या संदर्भाने बरीच घोषणा बाजी केली. पण सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलेपत्रेवार आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी या सर्व प्रकरणाला नियंत्रणात ठेवले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *