नांदेड,(प्रतिनिधी) – कायद्याला सर्वात मोठे स्थान देणाऱ्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक श्री अशोरावजी घोरबांड यांना चोरटयांनी आव्हान दिले आहे.चोरटयांनी पोलिसांचे घर फोडून १३ लाख ९० हजारांची चोरी केली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनेगाव येथे असलेल्या पोलीस वसाहतीतील पोलीस अंमलदार ज्ञानोबा कोंडीबा नाईकवाडे यांचे घर फोडतांना मुख्य दरवाज्याचे कुलूप १९ सप्टेंबरच्या सकाळी ५ वाजेपासून २० सप्टेंबरच्या सकाळी ३.४५ वाजे दरम्यान तोडले. आत प्रवेश करून चोरटयांनी लॉकर तोडले आणि त्यातून १३ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा ५६८/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ४५४,४५७.३८० प्रमाणे दाखल केला आहे.गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी पोलीस उप निरीक्षक नरवटे यांच्याकडे देण्यात आली आहे.
चोरी करणाऱ्या चोरटयांनी गुन्हा करण्या अगोदर अत्यंत कडक,शिस्तप्रिय आणि कायदा हा सर्वात मोठा आहे हे सांगतात अश्या पोलीस निरीक्षकांची ओळख विचारून घेतली असती तर नक्कीच एव्हडी हिम्मत केलीच नसती.