नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतः हजर आलेल्या खूनप्रकरणातील चार आरोपीना आज वृत्त लिही पर्यंत तरी अटक दाखवण्यात आलेली नाही. हे चार जण आले ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये तर असणारच ना तरीही काही कार्यवाही होत नाही हे तर सर्वात मोठे दुर्दैव आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढवळे कॉर्नर येथे चिखलीकरांच्या दारू दुकानाचे व्यवस्थापक माधव जीवनराव वाखोरे यांची सुरू दुकानावर हत्या करण्यात आली होती.हा प्रकार १ सप्टेंबर रोजी रात्री घडला होता.त्या प्रकरणातील ती जणांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने २४ तासातच जेरबंद केलं होते.या प्रकरणातील इतर आरोपींची नावे सुद्धा पोलिसांना माहित आहेत.
अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी इतर तीन ते चार मारेकरी स्वतः पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे हजर झाले आहेत.ते आले,त्यांचा वावर आता सीसीटीव्ही फुटेज मध्ये नसेल तर सरकारने राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये लावलेले सीसीटीव्ही कुचकामी असल्याचे दिसणार आहे.आज दिनांक २१ सप्टेंबरच्या आणि वास्तव न्यूज लाईव्ह बातमी प्रसिद्ध करे पर्यंतच्या वेळेत स्वतःहून हजर झालेल्या मारेकऱ्यांचा अटक फॉम भरल्याची माहिती बाबत कोणीही दुजोरा देत नाही.कायद्यात आरोपीला पकडल्यानंतर किंवा ते स्वतः हजर झाल्यानंतर सुद्धा साठी कायदा आहेच ना. असो पण काहीही करणे आणि त्यावर काही कार्यवाही न होणे हे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी काही नवीन नाहीच.एखादा एडीआय येतो आणि तो कायद्याची कलमे सांगतो त्यालाच पोलीस निरीक्षक कायद्या पेक्षा कोणी मोठे नाही असे सांगतात. शाब्बास शाब्बास !
संबंधीत बातमी…