क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडून आयुष्य पुढे कसे सरकवायचे हे जाणून घ्यायचे असेल तर नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांची भेट घेणे आवश्यक आहे. कारण अशा पध्दतीने आपले आयुष्य पुढे नेत त्यांना एक क्षण असा आला की, ज्यामुळे आयुष्य बदलून गेले आणि हा क्षण ओळखण्यात ते तरबेज आहेत. या सामर्थ्यावरच त्यांनी नांदेड जिल्ह्यात 700 दिवस पुर्ण करून हे दाखवून दिले की, चांगले काम करतांना आलेल्या अडचणी या महत्वपूर्ण नसून पुढे दिसणारा मार्ग जास्त महत्वपूर्ण आहे आणि त्यासाठीच काम करावे लागते, झटावे लागते, सहन करावे लागते, विरोध पत्करावा लागतो आणि मग कुठे तरी यश प्राप्त होते.
20 सप्टेंबर 2020 रोजी नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदावर प्रमोद शेवाळे हजर झाले. या संदर्भाने अर्थात प्रमोद शेवाळे यांच्या ईतिहासाची माहिती अत्यंत कमी लोकांना होती. त्यांनी आपल्या जीवनात केलेल्या वेगवेगळ्या नियुक्त्यांचे क्षण आणि त्यातील कार्यकाळ खुप मोठा नसला तरी दैदिप्यमान नक्की होता. आपल्या जीवनात त्यांनी अनेकांना काळजी करू नकोस सर्व काही ठिक होईल हेच सांगितले आणि त्यामुळे त्यांच्यासमोर आलेल्या लोकांच्या अर्ध्यापेक्षा जास्त अडचणी आपोआपच समाप्त झाल्या. नांदेड जिल्ह्यात कारभार सांभाळल्यानंतर प्रमोद शेवाळे यांच्यावर अनेक शब्दबाण सोडले गेले पण जेंव्हा कोणाच्या शब्दांना उत्तर दिले तर तो वाद होईल म्हणून त्यांनी मौन पत्कारले. याही परिस्थितीत त्यांनी पोलीस अधिक्षक नांदेड ही जबाबदारी सांभाळतांना कोठेच कमतरता पडू दिली नाही. प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देत आणि त्याचे समाधान करत त्यांनी सुरू ठेवलेले काम त्यांना 700 दिवसांपर्यंत घेवून आले. जगात असे म्हणले जाते जिवन त्याच माणसासोबत खेळ खेळते की, जो खेळाडू अत्यंत उत्कृष्ट असते. जीवनातील दु:ख हे सर्वांचेच एकसारखे आहेत. पण त्या मागे असणारी दृढता ही प्रत्येकाची वेगळी आहे. कोणी हाताश होवून विखरून जाते आणि कोणी संघर्ष करून उभा राहतो. तोच व्यक्ती पुढे जातो जो बदलतो. कारण सुरूवात ही सर्वांचीच एकसारखी असते अशा पध्दतीने आपल्या जीवनाचे मार्गक्रमण करत नांदेडमधील अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी आपली नांदेड जिल्ह्याची जबाबदारी पुर्ण करतांना प्रमोद शेवाळे यांच्या बद्दल कवी सुरेश भटांचे वाक्य लिहावे वाटते “कधी न सोडली कास सत्याची खोट्यात कधी मळलो नाही, रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच मी कोणाला कळलो नाही.’
नांदेड जिल्ह्यात काम करत असतांना काही राजकीय मंडळी, काही आपल्या स्वार्थासाठी पोलीसांचा उपयोग करणारी मंडळी, काही सहकारी अधिकारी आणि अंमलदार या सर्वांच्या मनातील आपल्या भावना माझ्याबद्दल कशा आहेत. याचा अभ्यास करतांना प्रमोद शेवाळे यांनी प्रत्येकाला हे सांगितले. हृदयाने सिध्द करा की आपण जीवंत आहोत. श्वास घेणे हा काही पुरावा नाही जीवंत असण्याचा. या वाक्याला अनुरूप त्यांनी केलेल्या आपल्या सर्व लोकांसोबतच्या व्यवहारात नक्कीच त्यांच्यातील दृढता दिसली. कोणाला कधी जोरात बोलायचे असेल, त्याच्या चुकीवर रागवायचे असेल या अशा वेळी सुध्दा प्रमोद शेवाळे यांनी आपला आवाज त्याला टोचेल ही बाब लक्षात ठेवून निरव शांतता धारण केली. त्यामुळे इतरांना संधीच मिळाली नाही. ज्या अर्थाने आम्ही संधी हा शब्द लिहिला आहे ती संधी प्रमोद शेवाळे यांना सुध्दा अनेक वेळेस मिळाली असेल पण त्या संधीचा दुरपयोग त्यांनी कधी केला नाही. आजच्या परिस्थितीत असे अनेक लोक आहेत. ज्यामध्ये त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी, अंमलदार, जनतेतील मंडळी, त्यांच्या संपर्कातील मंडळी, यांच्यासाठी त्यांना भरपूर काही ऐकावे लागले. हे ऐकत असतांना त्यांनी हा आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा उपयोग कसा केला याची असंख्य उदाहरणे आहेत. ही सर्व उदाहरणे लिहिली तर पुन्हा एकदा वास्तव न्युज लाईव्हवर अंलकारीक भाषेत ब्लॅकमेलिंग करणारे व्यक्ती म्हणून उल्लेख होईल. त्या उल्लेखांना आम्ही कधी भिलो नाहीत. कारण आम्ही सुध्दा सुरेश भट्टांच्या शब्दातील मी कोणाला कळलोच नाही याच व्याख्येतील व्यक्ती आहोत.शब्दांचा मोल जपत आम्ही आयुष्य जगलो आहोत आणि असच आयुष्य प्रमोद शेवाळे यांना मिळाव ते अनमोल व्हाव. काल 20 सप्टेंबर रोजी नांदेड शहरात पुष्प मिळत नव्हते या संदर्भाने शोध घेतला असता फुल विक्रेत्यांनी सांगितले माहित नाही काय पण भरपूर लोक पुष्पगुच्छ, पुष्पहार घेवून गेले आहेत आणि सर्व लोकांना पोलीस अधिक्षक कार्यालयात जाण्याची घाई होती असे ते फुल विक्रेते सांगत होते. यावरून काल 20 सप्टेंबर रोजी शहरात फुलांची कमतरता झाली होती त्याचे कारण पोलीस अधिक्षक यांनी आपल्या जबाबदारीचा दोन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केला यासाठी ही मंडळी पुष्पांचे गाठोडे घेवून पोलीस अधिक्षक कार्यालयात जात होते हे लक्षात आले. नेहमी सकारात्मक कामात व्यस्त राहणाऱ्या प्रमोद शेवाळे म्हणून नांदेड जिल्हा गुन्हेगारांच्या वर्चस्वापासून दुर राहिला. त्यांनी नेहमीच सकारात्मक राहावे आणि कर्मठ बनावे अशी शुभकामना….
– संपादक
