ताज्या बातम्या नांदेड

अल्पवयीन मुलगा सज्ञान झाल्यावर अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने शोधले;वडिलांच्या स्वाधीन केले  

नांदेड,(प्रतिनिधी)- सन २०१८ मध्ये रंगाच्या भरात आपले घर सोडून निघून गेलेल्या एका युवकाला नांदेड जिल्हा पोलीस दलातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने शोधून नांदेडच्या पोलीस दलाच्या कामगिरीत एक मानाचा तुरा खोवला आहे.आज पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी आपल्या नांदेड कार्यकाळाचे दोनवर्ष पूर्ण केल्याच्या दिवशीच पोलिसांनी हि उत्तम कामगिरी करून त्यांना भेट दिली आहे.

 

पोलीस ठाणे बिलोली हद्यीतील मौ. भोसी येथील फिर्यादी नागनाथ ज्ञानोबा पेदे वय ४२ वर्ष यांनी  २६ मार्च २०१८ रोजी फिर्याद दिली कि, त्यांचा मूलगा ज्ञानेश्वर नागनाथ पेदे वय १५ वर्ष हा घरून शाळेत जातो म्हणून गेला होता.  पण तो शाळेत न जाता शाळेत गैरहजर राहत असल्याबाबत माहिती मिळाल्याने मी त्यास घेऊन दि. १६ मार्च २०१८ रोजी शाळेत जाऊन विचारपूस करत असतांना मूलगा ज्ञानेश्वर हा शाळेच्या पाठीमागील भिंतीकडे गेला परंतु  तो परत न आल्याने आम्ही त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळून नेले असावे, त्याचा शोध व्हावा म्हणुन दिलेल्या फिर्यादवरुन  बिलोली येथे गुन्हा क्रमांक ७०/२०१८ कलम ३६३ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास पोस्ट बिलोली येथे सन २०२१ पर्यंत करण्यात आला. त्यानंतर सदरचा गून्हा पुढील तपासकामी अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे वर्ग करण्यात आला.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक  प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस उप अधीक्षक (गृह) तथा प्रभारी अधिकारी अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष डॉ. अश्विनी जगताप, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक,  व्दारकादास चिखलीकर यांचे अधिपत्याखाली महिला पोलीस उप निरीक्षक प्रियंका आघाव, तसेच पोलीस अंमलदार मारोती माने, अच्युत मोरे तसेच शितल सोळंके यांनी सदर गुन्हयाच्या तपासाच्या संबधाने माहिती घेतली असता, तपासादरम्यान एक संशयास्पद मोबाईल नंबर मिळाला त्या नंबरचा सायबर सेलच्या मदतीने लोकेशन घेऊन पोलीस उप निरीक्षक, प्रियंका आघाव, मारोती माने यांनी त्यानंबरवर संपर्क साधला असता सुरुवातीस सदर मुलगा उडवा उडवीचे उत्तरे देऊन स्वतःचे नाव सांगत नव्हता.  परंतु त्यास विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण संभाषण केल्यानंतर त्याने मी ज्ञानेश्वर पेदे असुन मी औरंगाबाद येथे आहे असे खात्रीपूर्वक सांगीतल्याने पिडीत मुलास ताब्यात घेवून त्यांचे वडिलांचे स्वाधीन केले आहे.

अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मागील दिड वर्षात अपहृत व हरवलेले १३ बालके त्यात ०८ मुले व ०५ मुली यांचा शोध घेऊन त्यांचे पालकांचे स्वाधीन केले आहे.पोलीस अधीक्षक, प्रमोद शेवाळे यांचे कडुन नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, शहरात संशयास्पदरित्या व बेवारस लहान मुले, मुली फिरताना मिळून आल्यास पोलीस विभागाशी संपर्क साधावा.आज आपल्या दोन वर्ष पूर्ण केल्याच्या दिवशी उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलिसांचे प्रमोद शेवाळे यांनी कौतुक केले आहे

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *