नांदेड,(प्रतिनिधी)- आज एका प्रवासात ॲटो रिक्षात विसरलेला मोबाईल चालकाने परत करुन काय असते ईमानदारी हे दाखवले.
आज दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी ऑटो MH 26 BD 4021 यारिक्षाचा चालक शेख मुस्कीम रा देगलूर नाका नांदेड प्रवाश्याचा मोबाईल गहाळ झाला होता. कार्तिक हे रिक्षा मध्ये धनेगाव ते रेल्वे स्टेशन प्रवासादरम्यान कार्तिक संभाजी बोटेवार रा धनेगाव, नांदेड यांचे मोबाईल ऑटो रिक्षा मध्ये धनेगाव ते रेल्वे स्टेशन प्रवासादरम्यान खिशातून मोबाईल पडुन रिक्षा मध्ये राहिला होता.कार्तिक हा आपल्या रोजच्या कामांच्या घाईत निघुन गेला. रस्त्यात पुढे गेल्यावर लक्षात आले की आपले मोबाईल कुठे गहाळ झाला की मग एकाचा फोन घेऊन आपल्या फोनवर फोन लावले तर कोणी उचलायला तयार नव्हते , मग रिक्षा चालक शेख मुशी यांनी टायगर ऑटोरिक्षा संघटना अहेमद (बाबा)ला फोन केला. अध्यक्ष साहेब एक मोबाईल रिक्षा मध्ये आहे तुम्ही कुठे आहात विचारले मी सांगितले घरी आहे. मी सांगितले फोन उचलून सांगा मोबाईल रिक्षा मध्ये सापडले होते,असे कार्तिकला सांगितले अहेमद बाबा आल्यावर कार्तिकची विचारपुस केली कार्तिक हा आनंद नगर येथील अनिल काफी शाप वर काम करतो असे सांगितले. भाऊ मी लई घाबरलो होतो , मोबाईल परत करतानी संघटना अध्यक्ष अहेमद बाबा रिक्षा चालक शेख मुशी, रिक्षा चालक व संघटनेचे मनापासून धन्यवाद केले.