नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने नांदेड शहरातील विसावा उद्यानात आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीदांना पुष्पचक्र अर्पन करुन आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीदांनी केलेल्या कार्याच्या आठवणीस उजाळा नांदेड जिल्हाआम आदमी पार्टीचे जेष्ठ नेते नरेंद्रसिंघ ग्रंथी यांनी दिला.यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम पांगरीकर यांची प्रमुख उपस्थीती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा सहसंयोजक ॲड.रितेश पाडमुख व नांदेड उत्तर व दक्षीण विधानसभाप्रमुख. ॲड. जगजीवन भेदे यांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र वाहण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.जयसिह चंदेल यांनी केले तर आभार श्री.दयानंद कदम यांनी मानले.