नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात आज प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंती दिनी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
17 सप्टेंबर हा दिवस अनेक कारणांनी नामांकित आहे. याच दिवशी केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, पोलीस अधिक्षक कार्यालयातील अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. त्या सर्वांनी केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
