नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड पोलीस दलातर्फे 33 वे क्रिडास्पर्धा दिनांक 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान घेण्यात आले असुन त्याचा समारोप प्रभारी पोलीस अधिक्षक एम सुदर्शन यांचे हस्ते पोलीस मुख्यालय नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदान येथे पार पडला.
सदर स्पर्धेमध्ये नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी भाग घेतला होता. संपुर्ण जिल्हयातुन चार संघ बनविण्यात आले होते. पोलीस मुख्यालय, नांदेड शहर, कंधार विभाग आणि भोकर विभाग असे होते. त्यामध्ये एकुण 90 खेळाडुनी भाग घेतला होता. त्यापैकी पुरूष 70 महिला 20 खेळाडु सामील झाले होते. या स्पर्धेत विवीध मैदानी खेळ घेण्यात आले. सांगीक खेळामध्ये हॉकी (पुरूष) पोलीस मुख्यालय प्रथम, नांदेड शहर द्वितीय, फुटबॉल (पुरूष) पोलीस मुख्यालय प्रथम, नांदेड शहर विभाग द्वितीय, हॉलीबॉल (पुरूष) पोलीस मुख्यालय प्रथम, कंधार विभाग द्वितीय, बॉस्केटबॉल (पुरूष) पोलीस मुख्यालय प्रथम, नांदेड शहर द्वितीय हॅण्डबॉल (पुरूष) नांदेड शहर विभाग प्रथम, पोलीस मुख्यालय द्वितीय कबड्डी (पुरूष) पोलीस मुख्यालय विभाग प्रथम, कंधार विभाग द्वितीय, खो खो (पुरुष) पोलीस मुख्याल प्रथम, भोकर विभाग द्वितीय, क्रॉस कंट्री (पुरुष) पोलीस मुख्यालय प्रथम, नांदेड शहर विभाग द्वितीय व्हॉलीबॉल (महिला) पोलीस मुख्यालय प्रथम, नांदेड शहर विभाग द्वितीय, बास्केटबॉल (महिला) पोलीस मुख्यालय विभाग प्रथम, नांदेड शहर विभाग द्वितीय कबड्डी (महिला) पोलीस मुख्यालय विभाग प्रथम, नांदेड शहर विभाग द्वितीय, खो खो (महिला) पोलीस मुख्याल प्रथम, नांदेड षहर विभाग द्वितीय, क्रॉस कंट्री (महिला) पोलीस मुख्यालय विभाग प्रथम, नांदेड शहर विभाग द्वितीय, वैयक्तीक खेळ अंतीम निकाल 100 मीटर धावणे, प्रथम पोकों / केशव आवचार, द्वितीय पोकों / अनान खॉन, 200 मीटर धावणे प्रथम पोकों / केशव अवचार, द्वितीय पोकों / अदनान खॉन, 400 मीटर धावणे, प्रथम पोकों / उदयसिंग चौधरी, द्वितीय पोकों / 3130, 800 मीटर धावणे प्रथम पोकॉ / सुरज सुभाष काकडे, द्वितीय पोकों / संदीप सुभाष ठाकुर, 1500 मीटर धावणे प्रथम पोकों / लखन फुलसिंग पवार, द्वितीय सचिन नागनाथ मग्नाळे, 3000 मीटर स्टीपलचेस धावणे प्रथम पोकों / उदयसिंग चौधरी, द्वितीय पोकों / सुरज सुभाष काकडे, 5000 मीटर धावणे, प्रथम पोकॉ / उदयसिंग चौधरी, द्वितीय सुरज सुभाष काकडे, 10,000 मीटर धावणे, प्रथम पोकॉ / उदयसिंग चौधरी, द्वितीय सुरज सुभाष काकडे, 110 मीटर धावणे अडथळा, प्रथम पोकों / केशव अवचार, द्वितय पोकों / अदनान खॉन, 400 मीटर धावणे अडथळा, प्रथम पोकों / केशव अवचार, द्वितीय ईब्राहीम शेख, ऊंच ऊडी, प्रथम पोकॉ / ओमकार नागुलवार, लांब ऊडी, प्रथम पोना / कृष्णा गंगाराम तलवारे, द्वितीय पोकों / एकनाथ विश्वनाथ क्षिरसागर, तिहेरी ऊडी, प्रथम पोना / कृष्णा गंगाराम तलवारे, अथलेटिक्स पुरूष भाला फेक, प्रथम पोकों / मनिष ठाकरे, द्वितीय गोविंद भांगे, गोळा फेक प्रथम पोकों / केशव अवचार, द्वितीय पोकॉ / वैभव मरकंटेवार, थाळी फेक प्रथम पोकों / म. इम्रान, द्वितीय पोकों / संदीप कोठुळे, वैक्यतीक खेळ अथलेटिक्स महिला 100 मीटर धावणे, प्रथम मपोकों / सुनिता मलचापुरे, द्वितीय निखीता चौथाले, 200 मीअर धावणे, प्रथम सुनिता मलचापुरे, द्वितीय मपोकों / शिल्पा शामराव राठोड, 400 मीटर धावणे, प्रथम मपोकों / पुजा नारायण नवले, द्वितीय मपोकों शिल्पा शामराव राठोड, 800 मीटर धावणे प्रथम मपोकों / शिल्पा शामराव राठोड, द्वितीय मपोकों / नाजमा कादर मोमीन, 1500 मीटर धावणे मपोकों / नाजमा कादर मोमीन, द्वितीय मपोकों / शिल्पा शामराव राठोड, 5000 मीटर धावणे, प्रथम मपोकों / शिल्पा शामराव राठोड, द्वितीय मपोकों / नाजमा कादर मोमीन, 100 मीटर धावणे अडथळा, प्रथम मपोकों / शिल्पा शामराव राठोड, द्वितीय मपोकों / पुजा नारायण नवले, 400 मीटर धावणे अडथळा, प्रथम मपोकों/शुभांगी हालसे, द्वितीय मपोकों / शिल्पा शामराव राठोड, ऊंच उडी, प्रथम मपोकॉ / ज्योती दामोदर भेलावे, द्वितीय मपोकॉ / पार्वती राम आरगुलवाड, लांब ऊडी प्रथम प्रियंका संभाजी वाघमारे, द्वितीय मपोकों/पार्वती रामा आरगुलवाड, गोळा फेक, प्रथम मपोकों / प्रियंका वाघमारे, द्वितीय मपोकॉ / ज्योती खंदारे, थाळी फेक, प्रथम मपोकों / वंदना घुले, द्वितीय मपोकों / पदमा जाधव, भाला फेक, प्रथम मपोकों / पमिता शिरसे, द्वितीय मपोकों / वंदना घुले, कुस्ती (पुरुष) 74 किलो, प्रथम पोकों / सिध्दार्थ गायकवाड, द्वितीय पोका / शिवाजी जुनगरे, 79 किलो प्रथम पोकों / शेख शोएब, द्वितीय पोकों / लखन पवार 86 किलो प्रथम पोकों / राजवंतसिंग बुंगई. द्वितीय पोकों / शिवाजी बिचकुले, जलतरण 100 मीटर फ्रिस्टाईल, प्रथम पोकॉ / अमोल गुंडरे, द्वितीय पोकों / शंकर पवार, 100 मीटर बैंकट्रोक, प्रथम पोकों / शेख शोयब, द्वितीय पोकॉ / श्याम माने, 100 मी. बेस्टस्ट्रोक प्रथम सपोनि शिवसांभ स्वामी, द्वितीय पोना / शिवानंद हंबर्डे, 50 मी. फ्रिस्टाईल, प्रथम पोना/ जगन्नाथ केंद्रे, द्वितीय पोकों / गोविंद भांगे, 50 मी. बटरफ्लाय प्रथम पोकों / केशव अवचार, 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रथम सपोनि शिवसांभ स्वामी, 400 मी.. 1500 मी फ्रिस्टाईल द्वितीय पोकों / केशव अवचार, पोलीसांचे पाल्या करीता संगीत खुर्ची प्रथम रूपाली देशभ्रतार, द्वितीय शिवाजी बालाजी गुडूप, लिंबुचमचा प्रथम सागरीका पवार,द्वितीय तेजल लहु राठोड, थैला रेस, प्रथम दिव्या खंदारे, द्वितीय जगदीश कुबडे, मानवीत मोरे, 5 वर्षा आतील मुले 50 मी. धावणे, प्रथम धनश्री हाटेकर, द्वितीय विराज नरवाडे, उत्कृष्ट खेळाडु पुरूष पोकों / केशव अवचार,उत्कृष्ट खेळाडु महिला मपोकों / शिल्पा राठोड, जनरल चॅम्पीयनशीप पोलीस मुख्यालय, नांदेड यांनी जिंकली नाही. सदर कार्यक्रमाची सुरूवात पोलीस वाद्य पथकाने प्रमुख अतिथीना मानवंदना देवुन करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्तावीक मा. श्री निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांनी केले. खेळाडुना मार्गदर्शन व विजयी खेळाडुंचे अभिनंदन प्रभारी पोलीस अधिक्षक एम सुदर्शन यांनी केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन एम सुदर्शन प्रभारी पोलीस अधिक्षक नांदेड, निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, अर्चित चांडक, सहा. पोलीस अधिक्षक उपविभाग बिलोली, डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु.) नांदेड, अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण, डॉ. सिध्देश्वर भोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा, विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद, द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक स्थागुशा व शहरातील शाखेतील प्रभारी पोलीस अधिकारी व अंमलदार सदर कार्यक्रमास हजर होते.
सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी, निसार तांबोळी, पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड, प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती डॉ. अश्विीनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु.) नांदेड, विजय धोंडगे, राखीव पोलीस निरीक्षक पो. मु. नांदेड, क्रिडा प्रमुख संतोष सोनसळे व त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे आभार श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु.) नांदेड यांनी मांडले तर सुत्रसंचालन सपोउपनि श्री विठ्ठल कत्ते, यांनी केले.