कुंडलवाडी,(प्रतिनिधी)- एका २० वर्षीय युवतीने आपल्याला जागायचेच नाही हा प्रण घेऊन जीवन संपवण्यासाठी बाभळी पुलावर उभी असतांना एक पोलीस अंमलदाराने आपले पोलीस काम विसरून तिला आत्महत्ये पासून परावृत्त करण्यासाठी घेतलेली मेहनत नक्कीच दखल घेण्यासारखी आहे.
मागील आठवड्यात कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस रघुवीरसिंह चौहाण श्री गणेश विसर्जनाची तयारी आणि आपले कर्तव्य पाहण्यासाठी धर्माबाद ते कुंडलवाडी या रस्त्यावरून येत असतांना बाभळी पुलावर एक २० वर्षीय युवती आपले अश्रू गाळत उभीं होती.रघुवीरसिंह चौहाण यांना एकदा वाटले की विचारणा करू की आपल्या कामावर जाऊ.पण दुसऱ्याच क्षणी आपली मानवता त्यांनी जागवली आणि त्या युवतीला विचारले काय झाले ? त्या युवतीने आता मला जगण्याची इच्छाच राहिली नाही,मी श्री गणेशा अगोदरच स्वतःचे विसर्जन करणार आहे.रघुवीरसिंह चौहाण यांना सुद्धा धक्काच बसला.घडत असलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी आपले सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांना माहिती दिली.पठाण यांनी सांगितल्या प्रमाणे आणि आपले कसब वापरात रघुवीरसिंह चौहाण यांनी त्या युवतीसोबत संवाद सुरु ठेवला.तेव्हा तिने सांगितलेली हकीकत गंभीर होती. आपले वडील दररोजच मद्य प्राशन करून येतात आणि आईला भांडतात. आता मला सर्व कळायला लागले आहे,मी अनेकदा समजून सांगितले पण वडिलांमध्ये काही एक बदल होत नाही. आणि म्हणूनच मी मृत्यूला जवळ करणार आहे. अश्या रघुवीरसिंह चौहाण यांनी आपली जबाबदारी आता काय आहे हे समजून घेतले आणि त्या युवतीला आत्महत्येपासून परावृत्त केलेच.तिच्या आई वडिलांना बोलावून समजून सांगितले आणि ती युवती सुखरूप आपल्या घरी पाठवली. आहे ना दखल घेण्या यीग्य घटना. आतातरी आपण सर्वानी पोलीस अंमलदार रघुवीरसिंह चौहाण यांचे कौतुक करूया.सामाजिक जबाबदारीचे भान कायम ठेवून आपण या समाजात जन्मलो आहोत फक्त समाजची सेवा करण्यासाठीच या वृत्तीला वास्तव न्यूज लाईव्ह सुद्धा सलाम करीत आहे.