ताज्या बातम्या नांदेड

मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी वरदान ठरलेल्या आरोग्य शिबीरास 22 सप्टेबरपासून प्रारंभ

राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम
नांदेड(प्रतिनिधी)-येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बी जे वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गत वर्षापासून मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठीआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराचा हजारो रुग्णांना फायदाझाला असून हे शिबीर या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. या वर्षी शिबिराचे हे बारावे वर्ष असून हे बाविसावे शिबीर गुरुवार दिनांक 22 ते 24 सप्टेबरया कालावधीत मगनपुरा, नवा मोंढा येथील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, प्र. उपाध्यक्ष कमल कोठारी, डॉ. लक्ष्मीकांत बजाज व शाळेचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे.
शहराच्या मगनपुरा, नवा मोंढा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूचे विकार असणाऱ्यामुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात गुरुवार दि 15 सप्टेबर रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, गोवर्धन बियाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा यांनीआत्ता पर्यंतच्या आरोग्य शिबिरात किती रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया करण्यात आली व किती रुग्णांना याचा लाभ झाला याची विस्तृत माहिती दिली.
आत्ता पर्यंतच्या एकवीस आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. याचा तब्बल 5 हजारापेक्षा अधिक रुग्णांना लाभ झाला आहे. नेत्रशस्त्रक्रियेमुळे दृष्टिहीन असलेल्या रुग्णांना दृष्टी मिळाली तर हाडाच्या शस्त्रक्रियेनंतर उभे राहण्यास असमर्थ असणाऱ्या रुग्णांना आता चालता येऊ लागले आहे. अनेक रुग्णांचे चालताना तोल जाणे, फिट्‌स येणे व ऑटीझम अशा मेंदूशी संबंधित आजारातून सातत्याने आरोग्य शिबिरात घेतलेल्या उपचारामुळे काहींची सुटका झाली आहे तर बहुतेक रुग्ण सुटकेच्या मार्गावर आहेत. हे आरोग्य शिबीर मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी वरदान ठरले आहे. या शिबिरात उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगाना येथील राज्यातूनही मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत.
नवीन रुग्णांसाठी पुर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी नवीन रुग्णांनी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय, मगनपुरा नवा मोंढा नांदेड येथे प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करावी तसेच शाळेत येणे शक्य नसणाऱ्या बाहेरगावच्या रुग्णांनी  8208114832, 8308002173 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यातआले आहे. प्रतीवर्षाच्या शिबिराप्रमाणे या वेळीही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व मुख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या नेतृत्वात आर. आर. मालपाणी मतिमंद व श्रीरामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयातील कर्मचारी जय्यत तयारी करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
लायन्स क्लब मिडटाऊनचाही सहभाग
मेंदूचे विकार असणाऱ्या या आरोग्य शिबिरात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन लायन्स कल्ब मिडटाऊन चे अध्यक्ष प्रेमकुमार फेरवानी व प्रकल्प समन्वयक प्रवीण अग्रवाल यांनी दिले असल्याची माहिती डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी दिली आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *