नांदेड(प्रतिनिधी)-बोधडी ता.किनवट येथे झालेल्या एका खूनाचा बदला मयताच्या नातेवाईकांनी त्वरीतच घेतला. अशा प्रकारे काही वेळेव्या अंतरात बोधडी येथे दोन खून घडले आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार व्यंकट सुरेश देवकर (२०) रा.बोधडी याचा अनिल मारोती शिंदे या व्यक्तीने क्षुल्लक कारणावरुन खून केला. याचा बदला घेतांना मयत व्यंकट सुरेश देवकरच्या नातलगांनी मारोती शिंदे (२७) याचा खून केला. मारोतीला मारणारे व्यक्ती कोण आहेत याचा शोध वृत्त लिहिपर्यंत लागला नव्हता. किनवटचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार सध्या बोधडी तालुका किनवट या गावात ठाण मांडून बसलेले आहेत. पण सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झाली नाही. पण एका खूनाचा बदला घेण्यासाठी त्वरीत प्रभावाने दुसरा खून झाला एवढीच माहिती प्राप्त झाली आहे. कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दल प्रयत्नशिल आहे.