नांदेड(प्रतिनिधी)-तहसीलदारांच्या आदेशानुसार ईस्लापूर शिवारातील एका शेत जमीनीचा ताबा देत असतांना काही जणांनी पोलीस उपनिरिक्षकासोबत धक्कबुक्की केली. याबाबत ईस्लापूर पोलीसांनी चार जणांविरुध्द सरकारी कामात अडथळा केला या सदरात गुन्हा दाखल केला.
ईस्लापूर येथील पोलीस उपनिरिक्षक योगेश बाबुराव बोधगिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास ईस्लापूर शिवारातील गोपाळ पाटील यांची विवादीत जमीन शेत गट क्रमांक 286 या जमीनीचा ताबा तहसीलदार किनवट यांच्या आदेशाने दिला जात होता. त्यावेळी योगेश बोधगिरे पोलीस संरक्षण घेवून तेथे हजर होते. यावेळी दत्ताराम गणपती भोयर, शिवशंकर दत्ताराम भोयर, गणेश दत्ताराम भोयर आणि सुलोचना दत्ताराम भोयर यांनी पोलीस उपनिरिक्षकांचे शर्ट धरून धक्काबुक्की केली, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि विषारी औषधाचा डब्बा हातात घेवून तुझ्या नावाने पिऊन मरतो याबद्दल जोरजोरात ओरडले. ईस्लापूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 91/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 323, 309, 504, 506 आणि 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास ईस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शेवाळे हे करीत आहेत.
