

नांदेड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक वाळवन रिसोर्ट, लोणावळा येथे दि. 11 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीत आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन पक्षाचे लढावू नेते विजयदादा सोनवणे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी निवड करण्यात आली मा.ना.डाँ. रामदास आठवले साहेब केंदिय सामाजिक न्याय राज्य मंञी भारत सरकार तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी निवडीची घोषणा केली.
महाराष्ट्रात रिपब्लिकन चळवळ वाढविणे, पक्ष संघटन मजबुत करणे यासाठी महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी विजयदादा सोनवणे यांची निवड केल्याचे ना. डॉ. आठवले यांनी सांगितले. या बैठकीस राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर, निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. बर्वे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा सरोदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, सरचिटणीस गौतम सोनवणे, महाराष्ट्र युवा अध्यक्ष पप्पु कागदे आदींची उपस्थिती होती. विजयदादा सोनवणे यांच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल पक्षाचे पदाधिकारी गौतम काळे, मिलिंद शिराढोणकर, धम्मपाल धुताडे, बालाजी धनसरे, संजय भालेराव, सचिन सांगवीकर, प्रकाश शिंदे, धर्माजी सावते, सोपान कांबळे, मोहन आसोरे, प्रतिक सोनवणे, शुभम मादसवार, सौ. निशा सोनवणे, सौ. भारतबाई काळे, सौ. कांताबाई वाघमारे, सौ. रमाबाई शिराढोणकर, सौ. प्रेमाबाई नवरे आदींनी अभिनंदन केले आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नांदेड जिल्ह्याच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.