नांदेड(प्रतिनिधी)- गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्री चाभरा येथे ओसरीत झोपलेल्या एका व्यक्तीचा खून झाला होता. हा प्रकार त्या मयताच्या भाच्याने घडविला होता. कारण तो भाचा मयताची मुलगी आपली पत्नी बनावी अशी इच्छा ठेवत होता. पण मामाने नकार दिल्यामुळे त्याने मामाला गणपती सोबतच जगाचा निरोप देवून टाकला. मनाठा पोलीसांनी या मारेकरी भाच्याला पकडल्यानंतर न्यायालयाने त्यास 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
9 सप्टेंबर रोजी सर्वत्र श्री गणेश विसर्जनाची धामधुम असतांना चाभरा गावातील बालाजी दिगंबर काकडे यांचा मध्यरात्रीनंतर कोणी तरी कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याचा प्रकार घडला. त्यांना त्वरीत उपचारासाठी दवाखान्यात देण्यात आले होते. परंतू त्यांचा मृत्यू झाला. सुतावरून स्वर्ग गाठण्याची नेहमीच मानसीकता असलेल्या पोलीस विभागाने यात तत्परता दाखवली आणि बालाजी काकडेचा भाचा एकनाथ बंडू जाधव (19) यास अटक केली. एकनाथ बंडू जाधवने मी मामाच्या मुलीशी लग्न करू इच्छीतो परंतू तो काहीच काम करत नाही म्हणून मला नकार दिला. या रागातूनच मी मामाचा खून केला आहे अशी कबुली पोलीसांसमक्ष दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलीसांनी एकनाथ बंडू जाधवला खूनानंतर 72 तास पुर्ण होण्याअगोदरच अटक केले. मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले की, न्यायालयाने एकनाथ बंडू जाधवला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…