नांदेड(प्रतिनिधी)-साप्ताहिक पेपर असतांना शेख याहिया शेख इसाकने सलग दोन दिवस पेपर छापून नियमांची पायमल्ली केली आणि त्यातून माझी बदनामी केली अशा आशयाचे निवेदन रामप्रसाद खंडेलवाल यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना दिले आहे. याबद्दलची माहिती देवून वास्तव न्युज लाईव्हला त्या संदर्भाची बातमी प्रकाशित करण्याची विनंती सुध्दा केली आहे.
रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भाने सध्या कायद्याची प्रक्रिया सुरू आहे. तरीपण त्यावर अधिकारी माझ्या घरी जेवायला येतात हे जाहीर करण्यात ज्याला आनंद वाटतो अशा भाडोत्री लेखकाच्या शब्दात शेख याहियाने रामप्रसाद खंडेलवाल यांची कोणताही पुरावा नसतांना बदनामी कारक वृत्त प्रसिध्द केले. शेख याहियाच्या आरएनआय क्रमांकामध्ये त्याचा हा पेपर नांदेड पुकार साप्ताहिक पेपर लिहिलेला आहे. मग सगल दोन दिवस 20 आणि 21 ऑगस्ट 2022 रोजी बातम्या प्रसिध्द करून कायद्याची पायमल्ली केली आहे असे या निवेदनात लिहिले आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते प्रविण साले हे चरित्रवान आणि दिग्गज असे नेते आहेत असे लिहिणे म्हणजे शेख याहियाच्या प्रमाणपत्राची प्रविण साले यांना गरज आहे असे वाटते. साप्ताहिक वर्तमानपत्र असतांना ते सलग दोन दिवस छापता येते काय असा प्रश्न उपस्थित करून रामप्रसाद खंडेलवाल यांनी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या समोर शेख याहियाने दिलेले डिक्लरेशन रद्द करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरपयोग करणाऱ्या शेख याहिया आणि संपादक शेख जावेद विरुध्द योग्यती कार्यवाही करून नांदेड पुकार वर्तमानपत्राची नोंदणी अशी मागणी या निवेदनात केली आहे.
