नांदेड,(प्रतिनिधी)- आपल्यात अनेक उपजत गुण असतात. परंतु त्या गुणांची ओळख आपण जगाला करून देत नाहीत. असा एक गुण दर्शन प्रकार श्री ‘हेरंब’ विसर्जन दरम्यान पाहायला मिळाला.विमानतळाचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी आपल्या बोटांमध्ये असलेली जादू ताशा वाजवून सार्वजनिक केली.मूळ ताशा वाजवणारा सुद्धा त्यांच्या कडे आश्चर्याने पाहत असलेला या व्हिडीओमध्ये दिसतो.
मागे काही दिवसांपूर्वी एका जिल्हाधिकारी साहेबानी रंगमंचावर केलेले नृत्य अत्यंत गाजले होते.राज्यभरातील श्री हेरंब विसर्जन सोहळ्यात पोलीस अधिकारी आणि अमलदारांनी केलेले नृत्य गाजले.त्यांना लाखो लोकांनी पसंदी दिली.आपल्यात असलेले सुप्त गुण दाखवण्यासाठीच असतात परंतु पोलीस दलात कार्य करताना कोणती गोष्ट,कोणती घटना,कोणते शब्द आपल्याच अंगलट येतील याचा काही एक नेम नसतो.परंतु आपले मन स्वस्थ तर आपल्याकडे समस्त या वाक्यावर विश्वास ठेवून आपले मार्गक्रमण करत राहिलो तर आपल्याला मार्गातील खडतर प्रवास सुद्धा आनंद देतो.
विमानतळाचे पोल्सी निरीक्षक अनिरुद्ध काकडे हे अत्यंत मिश्किल शब्दांनी इतरांना बोलतांना पहिले तर त्यांच्यात पोलीस आहे की नाही अशी शंका येते.पण अनेक वेळेस त्यांनी आपल्यातील पोलीस सुद्धा दाखवलेला आहे.ज्यांनी तो पोलीस पाहिला आहे त्यांना आता काही विचारण्याची गरज नाही. अनेक गुन्हेगारांना बोलते करण्याची त्यांनी वापरतात ती भाषा महाराष्ट्रातील सर्वच पोलिसांनी अवगत करायला हवी. असो.
मूळ मुद्दा मांडायचा होता तो श्री हेरंब विसर्जनाचा भाग्यनगरचा राजा या हेरंभाची विसर्जन मिरवणूक निघालेली होती.हेरंब भक्त अत्यंत उत्साहात मिरवणुकीत सहभागी झालेले होते.ढोल ताशांच्या गजरात मस्तवाल पणे मिरवणूक सुरु होती. तेव्हा हेरंब भक्तांनी बंदोबस्त करण्यासाठी तैनात असलेल्या विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांना आपल्या सोबत नृत्य करण्याची विनंती केली.तेव्हा अनिरुद्ध ज्यांच्या नावाचा अर्थच अरथळा नसलेला,न थांबवता येणारा असा आहे.त्यांनी हेरंब भक्तांना सांगितले कि मी आज पुन्हा एकदा २० वर्षांचा होतो आणि आपल्याला आनंद देतो.
आता काय करणार अनिरुद्ध काकडे याच्या कडे सर्वांचेच लक्ष लागले होते.अनिरुद्ध काकडे ताशा वाजवणाऱ्या कडे गेले आणि त्यांनी त्याच्या हातातील काड्या आपल्या हातात घेतल्या आणि सुरु केले वादन आता बारी त्यांची होती ज्यांनी अनिरुद्ध काकडे ताशा वाजवतांना पहिला आणि त्यांचे भानच राहिले नाही.एकदम तालात एकही ठोका न चुकू देत अत्यंत तालबद्ध ताशा वादन पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. अनेकांनी ठेका धरून नृत्य सादर केले. अशा हा अवलिया पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे नांदेडकरांनी पाहिला. मूळ ताशा वादकांचा चेहरा वाचकांनी सोबत असलेल्या व्हिडीओ मध्ये पाहावा म्हणजे वाचकांना कळेल की वास्तव न्यूज लाईव्हने अनिरुद्ध काकडे यांच्यासाठी वापरलेले शब्द किती समर्पक आहेत.
अलंकार माहीतच नसणाऱ्यांसाठी
वास्तव न्यूज लाईव्ह अलंकारिक भाषेचा वापर करतो हे अनेकांची पोट दुखी आहे.राज्याच्या शब्दांमध्ये वास्तव न्यूजने ‘हेरंब’ शब्दाचा वापर केला आहे. मराठी भाषेचा ‘ब्र’ जाणून घेण्याची अक्कल नसलेल्या मुर्खांना ‘हेरंभ’ शब्द माहित असणारच नाही. श्री गणेशाचे एक नाव हेरंब आहे हे लिहून वास्तव न्यूज ‘त्या’ दिड शहाण्यांच्या डोळ्यात काजळ नक्कीच घालू इच्छिते. अनिरुद्ध नावाचे अर्थ सुद्धा अलंकार न वापरता वास्तव न्यूज ने लिहिले आहेत.कारण अनेकांच्या बुद्धीची वास्तवाला नेहमीच कीव येत असते.