नांदेड(प्रतिनिधी)-बक्षीसात तुम्हाला स्कुटी मिळणार आहे असे सांगून एका भामट्याने एका वयस्कर महिलेची फसवणूक करून तिच्याकडील 45 हजार रुपयांचे दागिणे घेवून पोबारा केला आहे.
गंगासागर शिवाजी पुंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे पार्डी ता.लोहा येथे 10 सप्टेंबरच्या सकाळी 11.30 वाजता एक माणुस त्यांच्या सासूकडे आला आणि मी आंबेकर सोनार असल्याचे सांगितले. तुम्हाला बक्षीसामध्ये स्कुटी मिळणार आहे असे सांगून त्याच्याकडील खोटे सोने देवून त्यांच्या सासूकडील खरे 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे घेवून पोबारा केला आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार खाडे हे करीत आहेत.
