नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील तांडा बार समोर एका महिलेची नजर लपवून तिचा 90 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार चोरीला गेला आहे. तसेच ईस्लापूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 15 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. लोहा येथे उभ्या असलेल्या एका ट्रकचे चार टायर आणि दोन बॅटऱ्या असा 1 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे.
राजेश्री सदाशिव जंगम या 10 सप्टेंबर रोजी बसमधून प्रवास करत असतांना तांडा बार समोर कोणी तरी त्यांचा 90 हजार रुपये किंमतीचा पोहेहार चोरून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गिरे अधिक तपास करीत आहेत.
ईस्लापूर येथे प्रकाश माधव माहुरकर यांच्या घरातील खिडकीतून कोणी तरी 10 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर प्रवेश केला. कपड्याने भरलेले दोन बॅग, एक सुटकेस ज्यामध्ये दोन मनीमंगळसुत्र व आठ मनी होते असे 15 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. ईस्लापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार तोटेवाड अधिक तपास करीत आहेत.
उत्तम ज्ञानदेव जाधव यांची 14 टायरची ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.0889 ही लातूर-लोहा रस्त्यावर उभी असतांना 10 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 ते पहाटे 6 वाजेदरम्यान त्या गाडीतील 4 टायर डिस्कसह आणि दोन बॅटऱ्या असा 1 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
