नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात दरारा असणाऱ्या पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या कुशल नेतृत्वात बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या सक्षम पुढकारात नांदेड जिल्हा पोलीस पथकाने हिंगोली जिल्ह्यातील मौजे हट्टा येथे एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून 25 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणी 20 लाख 34 हजार 830 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 4 लाख 11 हजार 530 रुपये रोख रक्कम आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी कर्दनकाळ आहेत. त्यांना हिंगोली जिल्ह्याीतील हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळजापूर वाडी शिवारात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी निसार तांबोळी यांनी बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांची निवड केली. त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे, पोलीस उपनिरिक्षक संदीप जोंधळे, दिनेश येवले, पोलीस अंमलदार रुद्रा कबाडे, साईनाथ सांगवीकर, बाबू चरकुलवार, दत्ता पुणेबोईनवाड, सुनिता येळगे, भगवान कोतापल्ले, अनिल सिध्दापुरे, मारोती मुद्देमवार, चंद्रमणी सोनकांबळे असे पथक देण्यात आले. या पथकाने आपल्या सोबत दोन पंचसाक्षीदार घेवून तुळजापुर वाडी येथील दिलीप गणेशराव चव्हाण यांच्या शेतातील आखाड्याच्या टीनशेडमध्ये बांधलेल्या जनावरांच्या गोठ्यात छापा टाकला. तेथे अनेक जण गोलाकार बसून अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते.
पोलीस पथकाने बिट्टीसिंग नखुसिंग बावरी (27) रा.झरी जि.परभणी, लक्ष्मण राजानरसू गडप्पा (39) रा.रामकृष्णनगर परभणी, संजय मधोजी टेकोळे(47) रा.गौतमनगर परभणी, गजानन गंगाधर दुधारे (26) रा.फुकटगाव ता.पुर्णा जि.परभणी गणेश अच्युतराव कदम (30) रा. पुर्णा जि.परभणी, साईनाथ सोपानराव चव्हाण(23) रा.आडगाव ता.वसमत जि.हिंगोली, सागर तुकाराम मुंडे (28) रा.गौतमनगर परभणी, विशाल रामदास भिरमवार (30) रा.पावरलुम वसमत जि.हिंगोली, दामोदर अमृतराव सावंत (40) रा.बळेगाव ता.वसमत जि.हिंगोली, गंगाधर गोमाजी मानवतकर (48) रा.जवळाबाजार ता.औंढा जि.हिंगोली, विरसिंग मायासिंग दुधानी (52) रा.झरी जि.परभणी संजय शेषराव थोरात (45) रा.विश्र्वा कॉर्नर परभणी, व्यंकटेश रमेश वानखेडे (35) रा.संत तुकारामनगर परभणी, संजय दिगंबर घाडगे(52) रा.जिंतूर रोड परभणी, पंकज रामराव पांढरे (30) रा.गणेशपेठ वसमत जि.हिंगोली, गजानन विठ्ठलराव चव्हाण (45) रा.आडगाव रंजे ता.वसमत हिंगोली, श्रीकांत भिमराव खाडे (28) रा.वसमत जि.हिंगोली, गंगाधर कदरप्पा पतीकोंडा (40) रा.माधवनगर परभणी, दिगंबर तुकाराम जाधव (35) रा.कुरझाळ ता.औंढा जि.हिंगोली, ललित वसंत कांबळे (30) रा.गौतमनगर परभणी, विनय रमेश लहाने (25) रा.गौतमनगर परभणी, वैभव विश्र्वनाथ झोडपे (25) रा.उधग महादेव नगर परभणी, माणिक लक्ष्मणराव कदम (38) रा.पुर्णा, सिध्दांत बापूराव एंगडे (23) रा.मारोतीनगर परभणी सोबत स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम.एच.22 ए.पी.9191 चा चालक व मालक अशा लोकांविरुध्द हट्टा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या लोकांविरुध्द गुन्हा क्रमांक 348/2022 कलम 4 आणि 5 मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या ठिकाणी पोलीसांनी 4 लाख 11 हजार 530 रुपये जप्त केली आहे. दोन चार चाकी वाहन, 10 दुचाकी वाहने आणि 26 मोबाईल फोन असा एकूण 20 लाख 34 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावरून या ठिकाणी चालणारा जुगार अड्डा किती मोठ्या स्वरुपाचा होता याची कल्पना येते. हा जुगार अड्डा नामांकित होता हे सुध्दा येथे जुगार खेळतांना पकडलेल्या लोकांच्या राहण्याची ठिकाणे लक्षपूर्वक पाहिली तर बऱ्याच दुरवरून या ठिकाणी जुगारी जुगार खेळायला येतात असे दिसते. कर्दनकाळ असलेल्या पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी आपल्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक आणि इतरांच्या सहाय्याने केलेली ही कार्यवाही दाद देण्यासारखी आहे.
