नांदेड(प्रतिनिधी)-30 ऑगस्ट रोजी सापडलेल्या एका अज्ञात अनोळखी माणसाच्या प्रेताची ओळख पटली तेंव्हा ते 17 ऑगस्ट रोजी घरातून बाहेर गेले होते आणि 30 ऑगस्ट रोजी त्यांचे प्रेत सापडले होते. याबाबत अज्ञात आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत रावसाहेब कांबळे रा.कुमठा (बु) ता.अहमदपुर जि.लातूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शेताच्या कामासाठी लोहा तहसील येथे जात आहे म्हणून त्यांचे वडील रावसाहेब ग्यानोबा कांबळे (64) हे घरातून गेले. त्यानंतर त्यांचा घरच्या कुटूंबियांशी 26 ऑगस्टपर्यंत मोबाईलवर संपर्क होता. त्यानंतर संपर्क बंद झाला. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता माळाकोळी पोलीसांनी मला बोलावून सरकारी दवाखाना लोहा येथे एक प्रेत दाखवले ते प्रेत माझ्या वडीलांचे होते. त्यांचे दोन्ही हात मागे नॉयलॉनच्या दोरीने बांधलेले होते आणि त्यांना मस्की शिवारातील तळ्यात फेकुन दिले होते. या तक्रारीनुसार माळाकोळी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 96/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 201 नुसार अज्ञात मारेकऱ्याविरुध्द दाखल केला असून मारेकऱ्यांना शोधण्याची जबाबदारी आता माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक डोके यांच्यावर आली आहे.
