नांदेड(प्रतिनिधी)-दोन अनोळखी माणसांनी मालेगाव शिवारात एका ३८ वर्षीय व्यक्तीचा खून केल्याचा प्रकार घडला आहे.
पुजा संदीप इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेच्यासुमारास मालेगाव शिवारातील रेडचिल्ली धाब्याजवळ त्या आणि त्यांचे पती संदीप चंपतराव इंगोले (३८) रा.मालेगाव हे थांबले असतांना दोन जण तेथे आले. त्यांनी चेहर्यावर दस्ती बांधली होती. ते अंगाने सडपातळ होते. त्यांनी संदीप इंगोलेला शिवीगाळ करून त्यांच्या हातातील खंजीर व तलवारीच्या सहाय्याने जिवे मारण्याच्या उद्देशानेच त्या धारधार शस्त्रांनी संदीप इंगोलेच्या छातीवर आणि पाठीवर जबर वार करून त्यांचा खून केला आहे.
अर्धापूर पोलीसांनी पुजा संदीप इंगोले यांच्या तक्रारीनुसार भत्तरतीय दंड संहितेच्या कलम ३०२, २९४ आणि ३४ नुसार सोबत भारतीय हत्यार कायद्याचे कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.