नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दवाखान्यातील अधिकाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी 5 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगरच्या हद्दीत एक घरफोडून चोरट्यांनी 32 हजारांचा ऐवज चोरला आहे. तसेच मुखेड शहरात एक दुकान फोडून चोरट्यांनी 88 हजार रुपये रोख चोरले आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅलेक्सी अपार्टमेंट विष्णुपूरी येथे राहणारे जयंेंद्र परसराम राऊत हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी 1 सप्टेंबर रोजी आपल्या नोकरीवर गेले. त्यांच्या पत्नी नार्गाजुना पब्लिक स्कुलमध्ये शिक्षीका आहेत त्या सुध्दा कामावर गेल्या. या संधीचा फायदा घेत चोरटयांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि दोन तोळे सोन्याची चैन 1 लाख 30 हजार रुपये, सोन्याचे मंगळसुत्र 1 लाख 80 हजार रुपये, दोन सोन्याच्या अंगठ्या एक तोहे वजनाच्या किंमत 30 हजार रुपये, तीन ग्रॅमच्या दोन अंगठ्या, 25 हजार रुपयांच्या, सोन्याचे कानातील टॉप 60 हजार रुपये, शॉर्ट गंठण 38 हजार रुपयांचे, 4 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन 18 हजार रुपयांची 3 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिणे आणि 27 हजार रुपये रोख असा एकूण 5 लाख 11 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. हा गुन्हा 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेदरम्यान घडला. हा गुन्हा दाखल मात्र 2 नोव्हेंबरच्या रात्री 11.03 वाजता नोंद क्रमांक 54 नुसार दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास कर्तव्यदक्ष, गुन्हेगारांचे कर्दनकाळ, दीड वर्षापेक्षा जास्तकाळापासून तोंडी आदेशाने कार्यरत पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक उत्तम बुक्तरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिध्देश्र्वरनगर तरोडा येथे 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 1 ते पहाटे 5 वाजेदरम्यान चोरट्यांनी मधुसूदन परमेश्र्वर बंगनवार यांचे घरफोडले ते आपल्या मुळ गावी सिरंजनी येथे गौरी सणासाठी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
मुखेड शहरातील बाऱ्हाळी नाका येथे कल्पतरु सुपर मार्केट आणि सत्यसाई ट्रेडींग कंपनी आहे. त्यातील अमर गणपतराव पाळेकर यांचे तेलाच्या दुकानावरील टीनपत्रे कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि दोन दुकानांमधील 88 हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेली आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.
