नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील गोवर्धनघाट परिसरात वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका युवकाकडून एक लोखंडी गावठी पिस्टल जप्त केले आहे. या पिस्टलची किंमत 25 हजार रुपये आहे.
वजिराबाद येथील गुन्हे शोध पथकाला प्राप्त झालेल्या अत्यंत खात्रीलायक माहितीनुसार त्यांनी गोवर्धनघाट परिसरातील दुध विक्री करणारा हरीश प्रकाश भगत (30) यास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक लोखंडी, गावठी पिस्टल(अग्नीशस्त्र) मॅग्झीनसह सापडले. संजय निलपत्रेवार यांच्या तक्रारीवरुन हरीश प्रकाश भगत विरुध्द गुन्हा क्रमांक 311/2022 भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे हे करीत आहेत.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी वजिरबाद येथील गुन्हे पथकाचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, विजयकुमार नंदे, संतोष बेल्लुरोड, शेख इमरान, रमेश सुर्यवंशी, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम यांचे कौतुक केले आहे.
