नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहर उपविभागात एकूण 239 सार्वजनिक गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना अत्यंत शांततेत व तणावमुक्त वातावरणात झाली आहे अशी माहिती शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी प्रेसनोटच्या माध्यमातून प्रसिध्दीसाठी पाठवली आहे.
नांदेड शहर उपविभागात 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते रात्री 10 वाजेदरम्यान पोलीस ठाणे वजिराबाद-55, शिवाजीनगर-62, भाग्यनगर-48 आणि विमानतळ-74 अशा एकूण 239 सार्वजनिक गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. या समारोहाच्या बंदोबस्तासाठी शहर उपविभागात पोलीस उपअधिक्षक-1, पोलीस निरिक्षक-10, सहाय्यक पोलीस निरिक्षक-7, पोलीस उपनिरिक्षक-52, पोलीस अंमलदार-157, महिला पोलीस अंमलदार-47, गृहरक्षक दल-240 असे मनुष्यबळ उपलब्ध आहे आणि 27 वाहने श्री गणेश स्थापना करतांना गस्त करत होती. या श्री गणेश स्थापना सोहळ्यात गणेश भक्तांनी डी.जे. आणि कर्णकर्कष ध्वनींचे वाद्य वापली नाहीत. पारंपारीक ढोल, ताशे, सनई असे वाद्ये वाजवून गणेश भक्तांनी कोणतेही ध्वनी प्रदुषण न करता अगदी भक्तीमय, उल्हासीत, प्रफुल्लीत वातावरणात श्री गणेशजींची प्रतिष्ठापणा केली. या सर्व कृतीसाठी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख, पोलीस निरिक्षक सुधाकर आडे, नितीन काशीकर, अनिरुध्द काकडे आणि जगदीश भंडरवार यांनी गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आहे.
