नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी च्या वतीने नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे जनसंवाद अभियान या कार्यक्रमाअतंर्गत कार्यक्रम हा आम आदमी चे युवा जयसिंह चंदेल व पांडूरंग गायकवाड यांच्या पुढाकाराने आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाने व अध्यक्षतेखाली घेण्यात आला.या कार्यक्रमास आम आदमी पार्टीचे जेष्ठ नेते नरेंद्र सिंघ ग्रंथी,पार्टीचे सरचिटणीस डॉ. अवधुत पवार,सहसंयोजक अँड. रितेश पाडमुख नांदेड उत्तर व दक्षीण विधानसभाप्रमुख अँड जगजीवन भेदे, व फ़इम फारुख यांच्या प्रमुख उपस्थीत श्री.काळबांडे बळीराम,अतिश चव्हाण,शिवाजी पांचाळ,पांडूरंग गायकवाड, अशीष सोमवंशी,मारोती घोडके,यश नवघडे,धनंजय संगेवार,सुरज कांबळे,ऋतिक वाघमारे,विनोद खिल्लारे, जनार्धन देवराव,विशाल मोरे,सुमेध सोनकांबळे,मिलींद माळवे तळणीकर यांच्यासह असंख्य कार्यक्रत्यांनी जेष्ठ नेते नरेंद्र सिंघ ग्रंथी, डॉ. अवधुत पवार, अँड रितेश पाडमुख, अँड जगजीवन भेदे, यांच्या हस्ते आम आदमी पार्टीत प्रवेश घेतला.
यावेळी आम आदमी चे ध्येय धोरण,या विषयावर वरिल सर्वे नेत्यांनी कार्यक्रत्यांना सखोलपणे मार्गदर्शन केले. प्रवेश घेतलेल्यां सर्वे कार्यक्रत्यांनी आम आदमी पार्टीची विचारधारा घरोघरी पोहचण्यासाठी जिवाचे रान करुन आगामी नांदेड वाघाळा निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व दाखवुन देवु असा मनोदय व्यक्त केला.शेवटीं सर्वाचेआभार शिवाजी पांचाळ यांनी मानले.