नांदेड(प्रतिनिधी)-उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रीगणेश उत्सवानिमित्त आम्ही तयार आहोत हे दाखविण्यासाठी शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांनी आप-आपल्या हद्दीत पथसंचलन केले.
पोलीस विभागाच्यावतीने श्री.गणेश उत्सवादरम्यान मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नांदेड शहरातील इतवारा, वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे येथील सर्वच पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, गृहरक्षक दलाचे जवान आणि महिला पोलीस अंमलदार यांचा एकत्रित पथसंचलनाचा कार्यक्रम सर्वत्र संपन्न झाला. या माध्यमातून पोलीसांनी श्री.गणेश उत्सवात गडबड करण्याची मनशा असणाऱ्यांनी लक्षात ठेवावी की, आम्ही त्यांना असे काही करू देणार नाही असेच दाखवले.
