नांदेड(प्रतिनिधी)-मालेगाव-देगाव येथे जुलै महिन्यात घडलेल्या दोन गटांच्या भांडणातील दोन आरोपींना ऍड. यशोनिल मोगले यांच्या यशस्वी युक्तीवादानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे.
जुलै 2022 मध्ये मालेगाव-देगाव या दोन गावातील गटांमध्ये भांडण झाले. त्यावेळी पोलीस पथक तेथे पोहचले. घडलेल्या घटनेनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 353 नुसार महिला, वृध्द, बालके यांच्याविरुध्द अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा सर्व प्रकार 1 जुलै 2022 रोजीचा आहे.
या भांडणाच्यावेळी काही मंडळी दुसऱ्या गटाला अटक करा अशी मागणी करत असतांना पोलीसांशी त्यांची बाचा-बाची झाली आणि पोलीसांवर जिवघेणा हल्ला केला अशा आशयाचा गुन्हा क्रमांक 185/2022 दाखल झाला. या प्रकरणातील दोन जणांनी जिल्हा न्यायालय नांदेड येथे आपल्याला अटकपुर्व जामीन मिळावा असा अर्ज डॉ.आंबेडकरनगर येथील यशस्वी विधीज्ञ ऍड.यशोनिल मोगले यांच्यावतीने सादर केला. न्यायालयात ऍड.यशोनिल मोगले यांनी सादर केलेला युक्तीवाद न्या.एस.ई.बांगर यांनी मान्य केला आणि दोन जणांना अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे.
