गॅस पंप लुटणारे दोन चोर पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-आज सदभावना दिवस आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांचा जन्मदिन या दोन दिवसांच्या योगात स्थानिक गुन्हा शाखेचे पथकाने गॅस पंप लुटणाऱ्या दोघांना पकडले आहे. त्यांच्याकडून खडकुत येथे गॅस पंप लुटतांना चोरलेली रक्कम आणि चोरीचे मोबाईल आणि सोन्याचे दागिणे असा एकूण 1 लाख 51 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलीस ठाणे अर्धापूरच्या हद्दीत मौजे खडकूतच्या शिवारात सन 2022 च्या सुरूवातीच्या काळात खडकूत शिवारातील एका गॅस पंपावर चोरी झाली. त्या चोरीत रोख रक्कम व इतर साहित्य चोरीला गेले होते. त्याबाबत अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 112/2022 दाखल करण्यात आला होता.
आज नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांचा जन्मदिन. सोबतच आज सदभावना दिवस या दोन समारोहांचा योग साधून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथकाने मेंढला गावातील नागेश उर्फ कार्तिक उत्तत लढे यास ताब्यात घेतले. त्याने हा चोरीचा गुन्हा आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून केला होता. सोबत त्याने सांगितलेला त्याचा साथीदार विशाल मधुकर ढोलारकर रा.रामनगर अर्धापूर यालाही पकडले. त्याच्या ताब्यातून पोलीसांनी गॅस पंपावरून चोरी केलेली रक्कम, कांही चोरीचे मोबाईल, काही सोन्याचे दागिणे आणि गुन्हा करतांना वापरलेली दुचाकी गाडी असा एकूण 1 लाख 51 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त करून ते दोन्ही चोरटे पुढील तपासासाठी अर्धापूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, प्रभारी पोलीस अधिक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक गृह डॉ.अश्र्विनी जगताप आदींनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, संजय केंद्रे, विलास कदम, गणेश धुमाळ, राजू सिटीकर आणि अर्जुन शिंदे यांचे कौतुक केले आहे.
