नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस विभागाकडून ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने स्वराज सप्ताह अंतर्गत बुधवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय प्रांगणात राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने नांदेड पोलीस दलाच्या वतीने सकाळी अकरा वाजता प्रभारी पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली समूह राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपाधीक्षक (मुख्यालय) डॉ. अश्विनी जगताप यांच्या उपस्थितीत सामूहिकरीत्या राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक कार्यालय येथील अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते
.