नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड-भोकर रस्त्यावर एका 30 वर्षीय युवकाचे प्रेत सापडल्यानंतर त्याचा गळा कोणी तरी अज्ञात माणसाने आवळून त्याचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशिकांत त्र्यंबकराव श्रीमंगले मु.रा.छत्तीसगड राज्य सध्या रा.गितानगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 ऑगस्टच्या सकाळी 10 ते दि.14 ऑगस्टच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान सुशील त्र्यंबकराव श्रीमंगले (29) यांचा कोणी तरी अज्ञात माणसाने अज्ञात कारणासाठी कशाच्या तरी सहाय्याने गळा आवळून खून केला आहे. बारड पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 60/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.आर.तूगावे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक वानोळे यांच्याकडे देण्यात आला आहे.