नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवाचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. मुख्य ध्वजारोहण जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी केले.
याप्रसंगी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे व इतर अनेक प्रशासनिक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ध्वजारोहण झाल्यानंतर अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या हस्ते बक्षीत देण्यात आले. या कार्यक्रमा व्यतिरिक्त पोलीस विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका आदींसह सर्वच प्रशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण झाले. अनेक घरांवर, व्यापारी संकुलांवर तिरंगा झेंडा फडकत होता.
अनेक शाळा, अनेक महाविद्यालय आदींनी आप-आपल्या परिने रॅली काढल्या.दुचाकीवर निघालेली एमआयएम पक्षाची तिरंगा रॅली आकर्षक दिसत होती. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा झाला.