नांदेड(प्रतिनिधी)-15 ऑगस्टच्या पहाटे वसंतनगर रस्त्यावरील श्रीनिवास ऑईल शोरुमला आग लागली. अग्नीशमन दलाच्या तीन बंबांनी ही आग विझवली. यामध्ये आगीने 50 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
वसंतनगर रस्त्यावरील गॅस गोडाऊन जवळ रमेश चिंतलवार यांचे श्रीनिवास ऑईल शोरुम आणि सुपर मार्केट असे दुकान आहे. आज 15 ऑगस्टची धामधुम सुरू असतांना या दुकानातून धुर निघालेला पाहिल्यानंतर लोकांनी ही माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन बंबातून पाणी आणत या आगीला आटोक्यात आणले. या आगीमुळे 50 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले असल्याचे वर्तविण्यात आले.
