नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जबरी चोरी झाली असून दोन दुचाकीवर आलेल्या चार जणांनी त्यांना मारहाण करून 1 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे.
मोहम्मद इमरान मोहम्मद युसूफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 ऑगस्टच्या सकाळी 11.30 ते 11.45 अशा 15 मिनिटाच्या वेळेत विटभट्टी समोरील वांगी फाट्याजवून ते मुदखेड ते नांदेड असा प्रवास करत होते. त्यांच्या पाठीमागून दोन दुचाकीवर चार दरोडेखोर आले. त्यांची मोटारसायकल अडवून त्यांना मारहाण करून बाजूच्या शेतात नेले. एकाने त्यांच्या मांडीवर चाकुने दुखापत केली आणि दुसऱ्याने लाकडाने मारहाण केली. त्यांच्या खिशातील 1 लाख 35 हजार रुपये रोख रक्कम आणि 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा 1 लाख 50 हजारांचा ऐवज लुटून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार अधिक तपास करीत आहेत.
