ताज्या बातम्या नांदेड

अवैध वाळूची वाहतूक करणारी ब्लॅकलिस्टेड गाडी पोलीस उपअधिक्षक देशमुख यांनी पकडली

नांदेड (प्रतिनिधी)-शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक श्री.चंद्रसेनजी देशमुख साहेब यांनी ब्लॅकलिस्ट असतांना अवैध रित्या वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक करणारी हायवा गाडी सकाळी 4.30 वाजता पकडली आहे.
वास्तव न्युज लाईव्हने 6 ऑगस्ट रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून फक्त एकाच हायवा गाडीला वाळू उपसा करण्याची परवानगी असल्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. या गाडीचा क्रमांक एम.एच.23 ए.यु.1258 असा आहे. ही गाडी बीड परिवहन विभागाने ब्लॅकलिस्ट केल्याची माहिती त्या ऍपवरुन मिळते. तरीपण ही हायवा गाडी राजरोसपणे वाळूचा उपसा करत होती आणि व्यवसाय सुरू होता. त्यासंदर्भाचे अनेक वृत्त आम्ही प्रकाशित केले होते. पण काहीच कार्यवाही झाली नाही. अखेर शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक श्री.चंद्रसेनजी देशमुख साहेब यांनी स्वातंत्र अमृतमहोत्सवी वर्षाची पहाट सुरू होण्याअगोदर 4.30 वाजता ही गाडी पकडली. ही गाडी सध्या पोलीस ठाणे विमानतळ येथे उभी करण्यात आली आहे. या गाडीच्या मालकाचे नाव परिवहन विभागाच्या ऍपवर प्रविण राऊत असे दिसते. या गाडीला काळ्या यादीत टाकल्याचा सिआर नंबर 819353 असा आहे. त्याची नोंद 5 जुलै 2019 रोजी करण्यात आली आहे. सर्वत्र वाळू उपसा आणि वाळू वाहतुक बंद असतांना ही 1258 क्रमांकाची गाडी ब्लॅकलिस्टेड असतांना सुध्दा रात्रीतून वाळूची वाहतुक करत आहे. आता त्याबद्दल कार्यवाहीची प्रक्रिया सुरू होईल.
पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी कालच वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एम.एच.26 बी.ई.4992, भाग्यनगरच्या प्रांगणात एम.एच.26 बी.ई.9004 आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एम.एच.26 बी.ई.4507 या गाड्या पकडल्या होत्या. त्यातील दोन हायवा गाड्या आहेत आणि एक छोटी गाडी आहे. या सर्व गाड्यांमध्ये वाळूच भरलेली आहे आणि या सर्व गाड्या रात्री वाळू वाहतूक करतांना पकडण्यात आल्या आहेत. या संदर्भाची कार्यवाही करण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्याकडे पत्र पाठवले असतील. आता एक नवीन पत्र पुन्हा 1258 क्रमांकाच्या गाडीसाठी पाठवावे लागणार आहे.

या वादग्रस्त गाडी क्रमांक एम.एच.23 ए.यु.1258 चा खरा मालक कोण हा एक प्रश्न सुध्दा आता पोलीसांना आणि उपविभागीय अधिकारी अर्थात उपजिल्हाधिकाऱ्यांना शोधावा लागेल. या गाडीचा क्रमांक बीड परिवहन विभागात नोंदणी आहे. त्या विभागाने या गाडीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. गाडीच्या मालकाचे नावे परिवहन विभागाच्या ऍपवर वेगळेच आहे, मग ती गाडी नांदेडमध्ये कशी चालत आहे, कोणी खरेदी केलेली आहे, कोणाच्या ताब्यात आहे आणि कोण त्यातून वाळूची वाहतूक करतो याचा शोध सुध्दा महत्वपूर्ण आहे.

संबंधीत बातमी…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू उपसा करणारे एकच वाहन तेही काळ्या यादीतील 

 

 

 

 

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.