नांदेड(प्रतिनिधी)-वक्फ बोर्डाच्या त्रिसदस्यीय पिठामध्ये नांदेड येथील ऍड. मोहम्मद मोहियोद्दीन उर्फ मोईद मोहम्मद बाहोद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव आ.उ.पाटील यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने दि.12 ऑगस्ट 2022 रोजी शासन निर्णय जाहीर केला. या आदेशात नांदेड येथील ऍड. मोहम्मद मोहियोद्दीन उर्फ मोईद मोहम्मद बाहोद्दीन यांची राज्य वक्फ न्यायाधिकरणाच्या त्रिसदस्यीय न्याय समितीमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वक्फ अधिनियम 1995 मधील कलम 83 च्या पोट कलम 4 नुसार 1 ऑगस्ट 2017 रोजी त्रिसदस्यीय न्यायाधीकरण औरंगाबादची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधीकरण येथे मुस्लीम कायदा आणि विधीतत्वमिमांसाचे ज्ञान असणारी व्यक्ती नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यामध्ये शासनाने हा निर्णय घेतला आणि औरंगाबाद महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधीकरणाचे सदस्य म्हणून ऍड. मोहम्मद मोहियोद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऍड. मोहम्मद मोहियोद्दीन यांनी आपला रुजू झाल्याचा अहवाल महाराष्ट्राच्या राज्य वक्फ न्यायाधीकरण औरंगाबादच्या अध्यक्षांकडे सादर करायचा आहे. ही नियुक्ती 5 वर्षासाठी आहे.
ऍड. मोहम्मद मोहियोद्दीन यांचे वडील ऍड. बाहोद्दीन यांनी सरकारी वकील या पदावर बिलोली येथे एक तप काम केलेले आहे. ऍड. मोहम्मद मोहियोद्दीन यांची ख्याती सुध्दा कायद्याच्या ज्ञानाबद्दल भरपूर आहे. त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
