नांदेड (प्रतिनिधी)-एका 72 वर्षीय नराधमाने 6 वर्ष वयाच्या तीन अल्पवयीन बालिकांसोबत अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार आज दुपारी किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
याबाबतची सविस्तर महिती अशी की, या तीन 6 वर्षीय बालीका आपल्या शाळेतून 3 वाजता घरी आल्या. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रुपचंद मठावत (72) या नराधमाने त्यांना प्रत्येकी 2 रुपये देतो आणि तुमच्यासाठी त्यातून तुम्ही चॉकेल आणा असे आमिष दाखवले. 6 वर्षाच्या या तीन निरागस बालीका त्याच्या आमिषाला बळी पडल्या आणि त्याच्या घरात गेल्या. याप्रसंगी त्याच्या घरची सर्व मंडळी शेतात काम करत होती. या 72 वर्षीय नराधमाने त्या तिनही बालिकांवर अत्याचार केले. हा प्रकार आज दुपारी 3 वाजता घडला. बोंबाबोंब झाली आणि प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत आले. पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी अत्यंत त्वरीत गतीने रुपचंद मठावतला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी केली. तेंव्हा त्याने बालिकांसोबत लैंगिक अत्याचार केला असेल असा अभिप्राय आला. पोलीसांनी त्वरीत याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास किनवटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक वाठोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
आम्ही भारताच्या 75 वा स्वातंत्र्य अमृतमहोत्सव साजरा करत आहोत आणि या 72 वर्षीय नराधमाने तीन अल्पवयीन बालिकांवर अत्याचार केला आहे. आम्ही खरेच स्वतंत्र झालो आहोत काय ? याचा विचार केला तर सकारात्मक उत्तर देण्याची परिस्थिती या घटनेमुळे होत नाही. आम्ही आमच्या जीवनात काय करत आहोत याची जाण 72 वर्षीय व्यक्तीला नसेल तर आम्ही उगीचच जगावर राज्य करण्याच्या खोट्या वल्गना करीत आहोत.