नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी चोरून नेण्यात येणारी गाढवांची गाडी पकडली. त्यात कोंबुन कोंबुन 16 गाढवे भरलेली होती. त्यातील एका गाढवाचा मृत्यू झाला.15 गाढवांसाठी चाऱ्याची सोय पण करण्यात आली. हे गाढव पुर्णा येथून आणण्यात आले होते. गाढव मालकांनी श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांचे भावनीक होवून धन्यवाद व्यक्त केले आहे.
दि.12 ऑगस्टच्या मध्यरात्री 1.30 वाजता नांदेड नियंत्रण कक्षाने रात्रीच्या गस्त अधिकाऱ्यांना सुचना दिली की, एका महेंद्र बोलेरो पिकऍप गाडीचा पाठलाग करत पुर्णा पोलीस येत आहेत. ही गाडी अत्यंत भरधाव वेगात चालत आहे. तिला थांबवा. त्यानुसार नांदेड ग्रामीणचे भारदस्त पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी रात्रगस्त ड्युटीचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार यांना ही गाडी पकडण्याचे आदेश दिले. पोलीस अंमलदार गव्हाणकर, पवार, शेख मजहर, केंद्रे आणि हुमनाबादे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी बॅरीकेट लावले. या गाडीचा पाठलाग करत पुर्णा येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्रुबा घाटे आणि त्यांचे पोलीस अंमलदार येत होते. अखेर नांदेड ग्रामीण पोलीसांना ही गाडी थांबविण्यात यश आले. त्या गाडीचा क्रमांक ए.पी.39 यु.बी.0426 असा आहे. गाडीच्या माल ठेवण्याच्या जागेत अनेक गाढवांचे पाय बांधून एकमेकांवर काढवे रचलेली होती. या गाडीमध्ये एकूण 16 गाढवे होती. ती बाहेर काढण्यात आली. त्यातील एका गाढवाचा जीव गेला होता. उर्वरीत 15 गाढवांना जीवदान देत नांदेड ग्रामीण पोलीसांनी त्यांच्यासाठी चाऱ्याच्या व्यवस्था केली. पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार यांच्या तक्रारीवरुन वाहन सोडून पळून गेलेले चालक आणि गाडीचे मालक यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 490/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 279 आणि प्राणी कु्ररता अधिनियम 1960 च्या कलम 2(2)(ई) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 124 नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार गव्हाणकर यांच्याकडे देण्यात आला आहे. ही गाढवे पुर्णा येथील होती.गाढवांचे मालक हजर झाले. मरण पावलेल्या गाढवावर अंतिम संस्कार करून 15 गाढवे त्यांच्या मालकांना परत करण्यात आली. तेंव्हा गाढव मालकांनी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांचे भावनीक आभार व्यक्त केले आहेत.
