ताज्या बातम्या नांदेड

स्थानिक गुन्हा शाखेने तीन बकरी चोर पकडले; दोन लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-बकऱ्या चोरून चार चाकी गाडीत घेवून जाणाऱ्या तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली. त्यांनी केलेल्या तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे. 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या अत्यंत गुप्त माहितीनुसार एका चार चाकी वाहनात तीन माणसे बकऱ्या चोरून घेवून जात आहेत. याबाबत आपली माहिती वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांना देवून त्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे, पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक जसवंतसिंघ शाहु, पोलीस अंमलदार मारोती तेलंग, सुरेश घुगे, संजीव जिंकलवाड, तानाजी येळगे, विलास कदम, मोतीराम पवार आणि हनुमानसिंह ठाकूर यांना या चोरट्यांना पकडण्यासाठी पाठविले.
पोलीस पथकाने महाराणा प्रताप चौकात एक चार चाकी वाहन तपासणी केली. त्यामध्ये एक विधीसंघर्षग्रस्त बालक आणि जगतिसिंग किशोरसिंग तिलपितीया (29) रा.सखोजीनगर नांदेड, जोगिंदरसिंग रणजितसिंग चौहाण (21) रा.रेल्वेस्टेशन रस्ता नवीन मोंढा वसमत जि.हिंगोली, सोरनसिंग मंगलसिंग जुन्नी (26) रा.लक्ष्मीनगर नांदेड, असे लोक सापडले. या चोरट्यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा क्रमांक 279/2022, गुन्हा क्रमांक 285/2022 आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा क्रमांक 281/2022 असे तीन गुन्हे घडवले होते. चोरट्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून सात बकऱ्या, एक चार चाकी गाडी, एक दुचाकी गाडी, रोख रक्कम 6 हजार असा एकूण 2 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तीन चोरट्यांना पुढील तपासासाठी विमानतळ पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांचे कौतुक केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *