नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील १०२८सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पोलीस निरिक्षक पदोन्नती देण्यासाठी निवडसुची जाहीर केली आहे. ज्यामध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्रातील ३० सहाय्यक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयातील अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंगल यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या निवड सुचीनुसार राज्यातील एकूण १०२८ सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पोलीस निरिक्षक पदी पदोन्नती द्यायची आहे. त्यांच्या सेवाअभिलेखातील सर्व माहिती १६ ऑगस्टपर्यंत ईमेलवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
या यादीमध्ये नांदेड जिल्ह्यातील १२ सहाय्यक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे. त्यांची नावे विश्वंभर अर्जुनराव पल्लेवाड, श्रीनिवास गंगाराम रोयलावार, दिनेश दिगंबर सोनसकर, शिवप्रसाद माधवराव कत्ते, शिवाजी विश्वनाथ लष्करे, रेवनाथ कोंडीबा डमाळे, शिवराम राजाराम तुगावे, बालाजी रामराव भंडे, महादेव हनुमंत मांजरमकर, सविता मारोतीराव कलटवाड, किशोर बाबूराव बोधगिरे, सुनिल किशन माने अशी आहेत. या यादीत परभणी जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक रमाकांत हनुमंतराव नागरगोजे, राजकुमार पद्माकर पुजारी, सुरेश उत्तमराव थोरात, फेरोज खान उस्मान खान पठाण, महेश बाळासाहेब लांडगे, कपील पुंजाराम शेळके, अविनाश भुजंगराव खंदारे, बळवंत साहेबाण्णा जमादार यांचा समावेश आहे. या यादीत लातुर जिल्ह्यातील जितेंद्र विठ्ठल कदम, किशोर यमाजी तोरणे, श्रीशैल्य महादेव कोल्हे, व्यंकटेश सुग्रीव आलेवार, धनंजय सावताराम लोणे, संदीप आनंद कामत यांच्या नावाचा समावेश आहे. या यादीत हिंगोली जिल्ह्यातील गजेंद्र भानुदासराव सरोदे, बालाजी वसंतराव येवते, विशाखा किरणराव धुळे, गुलाब तुकाराम बाचेवाड यांचा नावांचा समावेश आहे. या एकूण १०२८ सहाय्यक पोलीस निरिक्षकांमध्ये १२ नागरी हक्क संरक्षण पथकातील आहेत.
या सर्व सहाय्यक पोलीस निरिक्षकांबाबत कांही गुन्हा दाखल असेल, कोणती चौकशी सुरू असेल, त्यांच्या सेवा पटात चांगल्या आणि वाईट नोंदणी कोण-कोणत्या स्वरुपाच्या आहेत. या सर्व प्रकारांची माहिती त्यांच्याकडून लिहुन घेवून पोलीस महासंचालक कार्यालयाला १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत ईमेलवर पाठवायची आहे. या संदर्भाने पोलीस महासंचालक कार्यालयाने जारी केलेली पिडीएफ फाईल बातमी सोबत जोडली आहे.