ताज्या बातम्या नांदेड

36 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सृष्टी जोगदंड पाटील यांची निवड

मराठवाड्यातील पहिल्या महिला खेळाडूला मिळाला सन्मान
नांदेड(प्रतिनिधी)- मराठवाड्यातील एकमेव महिला खेळाडू सृष्टी जोगदंड यांना 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी धनुर्विद्या या खेळप्रकरणातून रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्र संघात स्थान मिळाले आहे. नांदेडच्या ईतिहासात राष्ट्रीय स्पर्धे सहभागी होणारी सृष्टी ही पहिली महिला खेळाडू आहे.
भारतीय ऑलंपिक संघ व गुजरात ऑलंपीक संघटनेच्या वतीने दिनांक 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 दरम्यान प्रथमच गुजरात मध्ये 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामधील 36 खेळातील सात हजार खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील. सदरील स्पर्धेसाठी देशातील केवळ टॉप आठ राज्य सहभागी होणार आहेत. त्यात महाराष्ट्राचा समावेश असून नुकतेच महाराष्ट्र संघाची धनुर्विद्या निवड चाचणी ऑगस्ट 2022 रोजी अमरावती येथे घेण्यात आली .त्यात नांदेडच्या कुमारी सृष्टी जोगदंडने उच्चतम कामगिरी करत या स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली. त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तिच्या यशाबद्दल तिचे ऑलम्पिक प्रशिक्षक रविशंकर भारतीय, धनुर्वीधा संघटनेचे महासचिव तथा छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद चांदुरकर महाराष्ट्र आर्चरी संघटनेचे अध्यक्ष अँड. प्रशांत देशपांडे सर आंतरराष्ट्रीय पंच ब्रिजेश कुमार सर. शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे , आमदार डॉ. तुषार राठोड, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा ऑलम्पीक संघटना अध्यक्ष रमेश पारे , उपाध्यक्ष जनार्दन गुपीले, मनपा उपायुक्त रमेश चवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, संघटना अध्यक्ष खासदार हेमंत पाटील , सचिव वृषाली पाटील जोगदंड, अवतार सिंग रामगडीया, , डॉ. रमेश नांदेडकर, डॉ. राहुल वाघमारे, डॉ. अविनाश बारगजे, नेहरू युवा समन्वयक चंदा रावळकर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिग परीहार, महाराष्ट्र धनुर्विद्या सहसचिव सोनल बुंदेले, प्रविण गडदे, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे कोषाध्यक्ष रंगराव साळूंके, प्रा जयपाल रेड्डी, बाबू गंदपवाड, प्राचार्य मनोहर सुर्यवंशी, संघटना कार्याध्यक्ष डॉ हंसराज वैद्य.अनिल थडकर, प्रणव भांडूरे, हरिदास रणदिवे, मास्टर विजय कांबळे,शिवकांता देशमुख, बालाजी चेरले,संघटना सहसचिव नारायन गिरगावकर, अनिल बंदेल, संजय चव्हाण, संतोष कनकावार, मालोजी कांबळे, शिवाजी केंद्रे, प्रेम जाधव, सुशिल दिक्षीत, आदीनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *